Health Tips For Childrens: पालकांनो उन्हाळ्यात लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, हिट स्ट्रोकपासून होईल बचाव

Health News: उन्हाळ्यात आपल्या बाळांना त्रास होऊ नये यासाठी आईला जास्त काळजी घ्यावी लागते.
Health Tips For Childrens
Health Tips For ChildrensSaam Tv
Published On

Heath News: उन्हाळा सर्वांना नकोसा असतो. उन्हाळ्यात गरमी होणाऱ्या त्रासामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हैराण असतात. आपल्या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये (summers season) विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आहे. उन्हाळ्यामध्ये पालकांना जास्त टेन्शन असते. कारण त्यांना आपल्या लहान मुलांची विशेषतः नवजात मुलांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते.

उन्हाळ्यात आपल्या बाळांना त्रास होऊ नये यासाठी आईला जास्त काळजी घ्यावी लागते. लहान मुलांचे उन्हापासून (heat stroke) संरक्षण करणे आणि त्यांची काळजी घेणे ही आईची जबाबदारी असते. या उन्हाळ्यात आपण आपल्या लहान मुलांची कशापद्धतीने काळजी घ्यावी (Health Tips For Childrens) याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

Health Tips For Childrens
Tonsillitis : घशामध्ये टॉन्सिल वाढण्यापूर्वी थांबवा, अशी घ्या योग्य प्रकारे काळजी

योग्य कपडे निवडा -

लहान मुलांसाठी प्रत्येक ऋतुप्रमाणे योग्य कपड्यांची निवड करणे गरजेचे असते. ही कपडे मुलांच्या संरक्षणामध्ये खूपच महत्वाची भूमिका साकारत असतात. विशेषता उन्हाळ्यात लहान मुलांसाठी चांगली कपड्यांची निवड करावी लागते. उन्हाळ्यात मुलांना सैल आणि सुती कपडे घालावी. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांसाठी कपडे निवडत असताना पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. सुती कपडे कडक्याच्या उन्हामध्ये येणारा घाम शोषून घेतात. तसंच उन्हाळ्यात लहान मुलांना हलक्या रंगाचे आणि लांब बाह्यांचे कपडेच घालावे. यामुळे सूर्यापासून त्यांचे संरक्षण होईल आणि सनबर्नसारखी (Sunburn)समस्या उद्भवणार नाही.

Health Tips For Childrens
Finger Cracking : तुम्हालाही बोटे तडकण्याची सवय आहे? बिघडू शकते आर्थिक स्थिती, जाणून घ्या

थंड ठिकाणी ठेवा -

उन्हाळ्यात लहान मुलांना देखील गरमीचा प्रचंड त्रास होत असतो. त्यामुळे त्यांना नेहमीच थंड ठिकाणी ठेवण्याची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना गरम खोल्यात आणि पार्क केलेल्या कारमध्ये ठेवू नये. नाही तर त्यांना हिट स्ट्रोक (Hit stroke) सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात पालकांनी आपल्या मुलांसाठी समर-फ्रेंडली बेबी केअर प्रोडक्ट्सचा (Summer friendly baby care products) वापर केला पाहिजेत. यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही. तसंच जर तुम्ही आपल्या बाळासाठी कॅरियर वापरत असाल तर ते डेनिमसारख्या जाड कपड्यांऐवजी नायलॉनसारख्या हलक्या फॅब्रिक्सचे असावे. यामुळे मुलांना गरम होणार नाही.

Health Tips For Childrens
Mukesh Ambani New Car: मुकेश अंबानींची नवीन रोल्स रॉयस पाहिली का? किंमत जाणून व्हाल थक्क

हायड्रेटेड ठेवा -

लहान मुलांना उन्हाळ्यात हायड्रेटेड (Hydrated) वाटेल याची पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना उन्हाळ्यात असे पदार्थ खायला दिले पाहिजे ज्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढेल आणि ते नेहमी हायड्रेटेड राहतील.

सनस्क्रीन लावा -

उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर मोठ्या माणसांना जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास लहान मुलांना देखील होतो. त्यामुळे मुलांना घराबाहेर घेऊन जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हात घराबाहेर जाण्यापूर्वी मुलांच्या त्वेचेवर सनस्क्रीन (Sunscreen) लावा. लहान मुलांची त्वचा खूपच नाजूक आणि पातळ असते त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे (sunlight) त्यांच्या त्वचेला नुकसान लगेच पोहचते. सनस्क्रीन वापरत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, 6 महिन्यांपेक्षा लहान मुलांना सनस्क्रीन लावू नका. या ऐवजी तुम्ही मुलांना हलक्या कपड्यामध्ये झाका. यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या त्वचेला कोणताही त्रास होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com