Haunted Places In Panjab : पंजाबच्या 'या' भयावह ठिकाणांना तुम्ही कधी भेट दिली का?

Haunted Places : जे लोक भूत किंवा आत्म्यावर विश्वास ठेवत नाहीत अशा लोकांना हॉरर ठिकाणी एक्सप्लोर करायला आवडते.
Haunted Places In Panjab
Haunted Places In PanjabSaam Tv
Published On

Panjab's Haunted Places : पंजाब हे खूप सुंदर ठिकाण आहे येथील संस्कृती हिरवेगार शेत, पारंपरिक पोशाख आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असे पंजाब आहे. तिथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. तसेच पंजाब मध्ये काही झपाटलेले ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

जिथे लोक जाण्यास घाबरतात पण तरीही हजार लोक त्या ठिकाणी भेट देण्यास जातात. जे लोक भूत किंवा आत्म्यावर विश्वास ठेवत नाहीत अशा लोकांना (People) हॉरर ठिकाणी एक्सप्लोर करायला आवडते. तुम्हालाही जर अशा झपाटलेल्या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर तुम्ही पंजाब (Punjab) मधल्या या काही झपाटलेल्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोर करू शकता.

Haunted Places In Panjab
Horror Travel Place : 'हे' हिल स्टेशन आहे हाँटेड जागेसाठी प्रसिद्ध, तुम्हाला इथे जायला आवडेल का?

अमृतसर रेल्वे ट्रॅक -

पंजाब मधील अमृतसर जिल्ह्यातील हे अमृतसर रेल्वे ट्रॅक आहे जिथे ट्रेनच्या धडकेने अनेकांचा मृत्यू झाला होता. खरं सांगायचं तर 2018 साली जवळच दसरा मेळा भरला होता त्यामुळे लोकं ट्रॅकच्या बाजूने बसून दसरा मेळावा पाहत होतो.

अचानक त्याचवेळी ट्रेन रुळावरून घसरली आणि चेंगराचेगरी झाली यादरम्यान 62 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर तेथील स्थानिक रहिवासी सूर्यास्तानंतर जात नाहीत त्यांचे असे म्हणे आहे की मारणाऱ्यांचे आत्मे रूळावर भटकत असतात.

भटिंडा टेलिफोन एक्सचेंज -

हे ठिकाण भटिंडा शहरातील प्रसिद्ध रेल्वे टेलिफोन एक्सचेंज आहे जे त्याच्या भयानक कथांसाठी प्रसिद्ध आहे ब्रिटिशांच्या काळात येथे पोस्टमार्टम रूम होता जिथे अनेक महिने मृतदेह ठेवण्यात आले होते.

त्यावर संशोधन केले जात असे यानंतर याच इमारतीचे टेलिफोन एक्सचेंज मध्ये रूपांतर करण्यात आले असे म्हणतात की संध्याकाळ नंतर या ठिकाणी आवाज ऐकू येतात त्यामुळे संध्याकाळ नंतर लोक तिथे जात नाहीत.

Haunted Places In Panjab
Horror Places in Pune : पुण्यातील या भयानक स्थळांना कधी भेट दिली आहे का ?

चंदीगड हॉन्टेड हाऊस -

पंजाब ची राजधानी चंदिगड येथे एक असे घर आहे त्या घराच्या अवतीभवती सुद्धा कोणी फिरत नाही. चंदीगडच्या सेक्टर 16 मध्ये ते घर आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की त्या घरात आत्मे राहतात या घराबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे.

त्यानुसार या घरात राहणाऱ्या अनेक लोकांनी अचानक आत्महत्या केली होती त्यांनी आत्महत्या का केला हे अजून कळू शकले नाही. पण लोकांना या घराजवळ जायचे भीती वाटते.

कपूरथलाचा भूत -

पंजाब मध्ये असलेल्या एका घराला भूत बंगला म्हणतात. हा बंगला अनेक एकर जागेत पसरलेला आहे. हा बंगला अनेक वर्षापासून असुरक्षित घोषित करण्यात येत आहे.

या बंगल्यात विचित्र आवाज ऐकू येतात असे म्हणतात की संध्याकाळी भुते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे बोलवतात त्यामुळे लोक संध्याकाळी या बंगल्या भोवती फिरण्यास घाबरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com