Hanuman Janmostav In Maharashtra : राज्यभरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा !

Hanuman Jayanti : राज्यभरात अनेक भाविकांची मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिरात व ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.
Hanuman Janmostav In Maharashtra
Hanuman Janmostav In MaharashtraSaam Tv
Published On

Hanuman Janmostav Celebration : आज राज्यभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात अनेक भाविकांची मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिरात व ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी हनुमान भक्तांची रात्रीपासूनच अलोट गर्दी झालीय. पहाटे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. निद्रिस्त अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) एकमेव भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येत असतात.

Hanuman Janmostav In Maharashtra
Hanuman Janmotsav : बजरंग बली की... हनुमानाचा जन्म कसा झाला ? मारुतीला हनुमान का म्हटले जाते ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं भद्रा मारुतीचे मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हनुमान भक्त पायी चालत रात्रीच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यासोबतच आज दिवसभर दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. हनुमान भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून पोलिसांच्या (Police) वतीने मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात हनुमान जन्मोत्सवाला तिखट-गोड मेजवाणीच्या महाप्रसादाची मेजवाणी आकर्षण ठरतेय. देशभरात (World) वेगवेगळ्या रितीरिवाजात हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे 11 पोती गव्हापासून 3 लाख पु-या, 20 पोती कांद्यापासून 2 हजार किलो कांद्याची झणझणीत चटणी,10 मोठे जम्बो पिंप भरून गुळवणी अशा तिखट गोड जेवनाच्या महाप्रसादाचा बेत आखलाय

Hanuman Janmostav In Maharashtra
Hanuman Janmotsav 2023 : हनुमान जन्मोत्सव कधी आहे ? जाणून घ्या शुभ मुहूर्त व तिथी

बुलढाण्यात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र ०६ च्या बाजूला असलेल्या नांदुरा येथील विश्वातील सर्वात उंच अशा आज हनुमान जन्मोत्सव असल्याने या विशालकाय मूर्तीला जलाभिषेक होऊन आज या उत्सवाची सुरुवात होईल. दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमात हनुमान ट्रस्ट कडून एक आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल आहे.एकंदरीत हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर इकडे भक्तांची मोठी गर्दी असणार आहे.

हनुमान जयंती निमित्त जुन्या नाशिकमध्ये सामूहिक मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं. जुन्या नाशिकमधील छपरीची तालीम परिसरात हनुमान जयंती सोहळ्याच्या निमित्ताने ११०० भाविकांनी एकत्र येत एका ताला सुरात मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हटली. यावेळी बजरंगबलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com