Hair Fall: शरीरात जीवनसत्त्वांची कमी झाल्यानंतर होऊ शकते केसगळतीची समस्या

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या आहारातही बदल होत जातो.
Hair loss, Vitamins problem, Hair falls, how to stop hair fall immediately, Hair fall causes,
Hair loss, Vitamins problem, Hair falls, how to stop hair fall immediately, Hair fall causes, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या आहारातही बदल होत जातो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलतात. (Hair fall causes & Solurion)

हे देखील पहा-

आपल्या प्रत्येकाला लांबसडक व काळेभोर केस आवडतात परंतु, आपले केस सतत गळत असतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या आहारात जीवनसत्त्व किंवा खनिजांची मात्रा कमी झाल्यानंतर बहुतेक आपले केस गळू लागतात. केस लांब व दाट होण्यासाठी आपल्याला आहारात पोषकत्त्वांचा समावेश करायला हवा. कोणते जीवनसत्त्व आहारात असायला हवे हे जाणून घेऊया(how to stop hair fall immediately)

१. आपल्या आहारात जीवनसत्त्व ब-७ चा समावेश करायला हवा. हे शरीरातील पेशींसाठी चांगले असते. त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला केस गळती व त्वचेर डाग पडतात. याची कमतरता गरोदर व बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांमध्ये अधिक आढळते. आपण आपल्या आहारात अंडी व कडधान्याचा समावेश करायला हवा.

Hair loss, Vitamins problem, Hair falls, how to stop hair fall immediately, Hair fall causes,
आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशीपला कशाप्रकारे सांभाळाल ?

२. आपल्या शरीराला योग्य रक्त पुरवठा करण्यासाठी लाल रक्तपेशींना लोहाची गरज अधिक असते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, त्वचा पिवळी पडणे आणि केस गळणे देखील होऊ शकते. लोहाची कमतरता मासिक पाळीत जास्त प्रवाहामुळे किंवा काही जुनाट आजारामुळे होऊ शकते. अशावेळी आपण आहारात लाल मांस, पालेभाज्या, शेंगा यांचा समावेश करु शकतो.

३. लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळते. आपल्या आतड्यांमध्ये लोह शोषण्यासाठी जीवनसत्त्व क आवश्यक आहे. जीवनसत्त्व क लिंबूवर्गीय फळे (Fruit), पालेभाज्या, स्ट्रॉबेरीचे सेवन करायला हवे.

४. जीवनसत्त्व (Vitamins) ड हाडांसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे केस गळणे सुरू होते. सूर्यप्रकाश मिळाल्यावर आपली त्वचा चांगली होते. मात्र, शरीरातील जीवनसत्त्व ड ची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात मासे किंवा दुधाचा समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com