Google Play Store पॉलिसी उद्यापासून बदलणार; Call Recording मध्ये होणार 'हा' मोठा बदल!

Google ने नुकतंच आपल्या Play Store च्या पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. जे उद्याच्या 11 मे पासून लागू होतील.
Google Play Store News, Latest tech news in Marathi
Google Play Store News, Latest tech news in MarathiSaam Tv
Published On

Google ने नुकतंच आपल्या Play Store च्या पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. जे उद्याच्या 11 मे पासून लागू होतील. पॉलिसी सहित अनेक बदल दिसून येतील यातील एक बदल म्हणजेच Android मध्ये Call Recording अप्स नेहमीसाठी बंद होणार आहेत. (Latest tech news in Marathi)

Google हळूहळू अनेक Android व्हर्जनवर कॉल रेकॉर्डिंग सक्षम करणारे API कमी करत आहे आणि काढून टाकत आहे. कंपनी हे प्रायव्हसी आणि सेक्युरिटीच्या नावाखाली करते आणि तसेच कॉल रेकॉर्डिंगचे कायदे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगळे आहेत यासाठी हे केले जात आहे.

Android 10 मध्ये, Google ने डीफॉल्टनुसार कॉल रेकॉर्डिंग ब्लॉक केले आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी, Play Store अॅप्सने कॉल रेकॉर्ड करण्यासाठी Accessibility API वापरण्यास सुरुवात केली होती. पण उद्यापासून गुगलने नवीन बदल लागू केल्यानंतर हे ही शक्य होणार नाही.

Google Play Store News, Latest tech news in Marathi
'तो' व्हायरल फोटो नवनीत राणांना भोवणार? शिवसेना नेत्यांची पोलिसात तक्रार!

हा नियम फक्त थर्ड पार्टीसाठी;

Google ने सांगितले की Google ची ही पॉलिसी केवळ Play Store वरील थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप्सपुरते मर्यादित आहे. Mi Dialer सह Google Pixels किंवा Xiaomi फोन सारख्या फोनवर नेटिव्ह कॉल रेकॉर्डिंग फंक्शन प्रभावित होणार नाही.

त्यामुळे, जर तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डर फिचर वापरायचे असेल, तर असे काही ब्रँड आहेत जे ते त्यांच्या डिव्हाइसमध्ये हे Internal Features म्हणून देतात. यामध्ये Xiaomi / Redmi / Mi, Samsung, Oppo, Poco, OnePlus, Reality, Vivo आणि Tecno मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे.

हे देखील पाहा-

आपण पाहतो की, बाजारात उपलब्ध असलेले अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कॉल रेकॉर्डिंग फिचर मोबाइलमध्ये देतात. त्यामुळे, कॉल रेकॉर्डिंग अॅप्स ब्लॉक करण्याच्या Google च्या निर्णयाचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com