
सध्याचे सर्वांचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. धावपळीच्या जगात कोणाकडेही पुरेसा वेळ नाही. सर्वजण इंटरनेटवर अवलंबून आहेत. याचवेळी अगदी अभ्यासापासून ते कोणत्याही रेसीपीपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. यात सर्वात मोठा वाटा हा गुगलचा आहे. गुगलच्या माध्यमातून आपण काहीही शोधू शकतो. गुगलचा आज पंचवीसावा वाढदिवस आहे. आज गुगल हे सर्च इंजिन माध्यम कसे बनले? याची सुरुवात कोणी केली? जाणून घेऊया
गुगल आज जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलने २५ वर्षपूर्तीनिमित्त एक खास डूडलदेखील बनवले आहे. २५ वर्षांपूर्वीचे गुगल ते आजचे गुगल याचा प्रवास हा पाहण्यासारखा आहे.
गुगलचा शोध
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलचा शोध कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी लावला आहे. लॅरी पेज आणि सर्जू ब्रिन यांनी हे सर्च इंजिन सुरू केले. ९० दशकाच्या शेवटी या दोघांची स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत भेट झाली.
एक चांगले सर्च इंजिन बनवण्यासाठी या दोघांनी खूप प्रयत्न केले. याची सुरुवात एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून झाली होती. २७ सप्टेंबर १९९८ ला Google Inc.चा जन्म झाला. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी Google.stanford.edu या अॅड्रेसवर सर्च इंजिन तयार केले. या दोघांनी हे सर्च इंजिन लाँच होण्यापूर्वी याचे नाव Backrub ठेवले होते. त्यानंतर नाव बदलून Google केले.
आज गुगलचा २५ वा वाढदिवस
1998 पासून गुगलमध्ये खूप बदल झाले आहेत. हे बदल गुगलच्या डूडलमध्ये दाखवण्यात आले आहे. जगभरातील सर्व माहिती गोळा करणे आणि ती सर्वत्र चांगल्या कामांसाठी उपलब्ध करणे हे गुगलचे ध्येय आहे. जगभरातील असंख्य लोक काम करण्यासाठी, एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी गुगलचा वापर करतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.