Airtel ने लॉंच केले ४ जबरदस्त प्लान; डेटा आणि कॉलिंगसह मिळणार बरंच काही

एअरटेलने ग्राहकांसाठी 4 नवीन रिचार्ज प्लान लाँच केले
Airtel New Recharge Plan
Airtel New Recharge PlanSaam Tv

नवी दिल्ली : तुम्ही जर भारतीय एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एअरटेलने ग्राहकांसाठी 4 नवीन रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. विशेष बाब म्हणजे कंपनीच्या चारही प्लानची ​​किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे. या 4 प्लानमध्ये 2 स्मार्ट रिचार्ज प्लान आणि दोन रेट कटिंग प्लान आहेत. यामध्ये 109, 131, 109 आणि 111 च्या प्लानचा समावेश आहे. (Airtel New Recharge Plan)

Airtel New Recharge Plan
Gold Silver Price Today : सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीचा दरही वाढला; पाहा आजचा भाव

एअरटेलचा 109 रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या 109 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता आणि 200MB डेटा आणि 99 रुपयांचा टॉक-टाइम मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि लँडलाइन व्हॉईस कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे मोजावे लागतील. तर एसएमएसची किंमत प्रति स्थानिक एसएमएस 1 रुपये आणि प्रति एसटीडी एसएमएस 1.44 रुपये असेल.

एअरटेलचा 111 रुपयांचा प्लान

कंपनीच्या या प्लानमध्ये ग्राहकांना 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो आणि त्यात 200MB डेटा दिला जातो. या प्लानची ​​वैधता एक महिन्याची आहे. प्लान अंतर्गत, लोकल, एसटीडी आणि लँडलाइन कॉलची किंमत प्रति सेकंद 2.5 रुपये आहे. लोकल एसएमएसची किंमत 1 रुपये आहे, तर एसटीडी एसएमएसची किंमत 1.5 रुपये आहे. (Airtel Recharge Plan)

Airtel New Recharge Plan
देशात कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या, 28 मृत्यू

एअरटेलचा 128 रुपयांचा प्लान

कंपनीच्या नवीन एअरटेल प्लानची ​​किंमत 128 रुपये आहे आणि ग्राहकांना यामध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. या प्लान अंतर्गत लोकल आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि राष्ट्रीय व्हिडिओ कॉलसाठी 5 रुपये प्रति सेकंद आकारले जातील. मोबाईल डेटासाठी 0.50 रुपये प्रति एमबी आकारले जातील.

एअरटेलचा 131 रुपयांचा प्लान

एअरटेलचा 131 रुपयांचा रिचार्ज प्लान अगदी एका महिन्यासाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत वापरकर्त्यांना स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 रुपये आणि राष्ट्रीय व्हिडिओ कॉलसाठी प्रति सेकंद 5 रुपये आकारले जातात. याशिवाय, स्थानिक एसएमएसची किंमत 1 रुपये आहे, तर एसटीडीची किंमत 1.5 रुपये / एसएमएस आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com