IRCTC News: गावी जायचंय! एसटीचे तिकीट मिळत नाहीये? ऑनलाईन पद्धतीने करा तिकीट बुक

IRCTC And MSRTC News : आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन पद्धतीने एसटीचे तिकीट बुक करु शकता.
IRCTC News
IRCTC NewsSaam Tv

Railway And Bus Ticket Booking

सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेत. गणेशोत्सवासाठी अनेकजण गावी निघाले आहेत. गावी जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच अनेक प्रवाशांना एसटीचे तिकीट बुक करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन पद्धतीने एसटीचे तिकीट बुक करु शकता.

अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात. काही अंतराच्या प्रवासासाठी लोक एसटीला प्राधान्य देतात. परंतु त्यांना तिकीट बुकिंगसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटीच्या तिकीटांसाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहाण्याची गरज नाही. आयआरसीटीच्या वेबसाइटवरुन एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.

IRCTC News
Mehndi Wedding Tradition: लग्नात नवरा-नवरी हातावर मेहंदी का काढतात? यामागचं खरं कारण काय?

प्रवाशांना एसटीचे तिकीट काढण्यासाठी जवळच्या एसटी सेंटरवर जाऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यात तिकीट मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही एसटीचे तिकीट बुक करु शकता.

आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळात तिकीट बुकिंगसाठी एक करार झाला आहे. प्रवाशांना एकाच वेबसाइटवरुन रेल्वे आणि एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वेने प्रवास करणारे ७५ टक्के प्रवासी आयआरसीटीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करतात. हीच सुविधा एसटीच्या प्रवाशांसाठीही उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळात करार झाला आहे. यामुळे रेल्वे, एसटीचे सर्व तिकीट बुक करणे सोपे होणार आहे.

एसटीचे तिकीट कसे बुक कराल?

एसटीचे तिकीट बुक करण्याची सर्व माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाइट https://www.bus.irctc.co.in किंवा अॅपवरुन तिकीट बुक करु शकता.

IRCTC News
Ganesh Chaturthi त Vivo ची जबरदस्त ऑफर, 'या' स्मार्टफोन्सवर देत आहे 8,500 रुपयांपर्यंत सूट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com