Gold Silver Price Today : सोनं, चांदी झालं स्वस्त; पाहा किती आहे आजचा भाव

जागतिक बाजारात सोन्याची किंमत 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली.
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today Saam Tv

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याची किंमत 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या (Silver Price) दरात मोठी घट झाली. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत सुद्धा दिसून आला. मंगळवारी सकाळी भारतीय सराफा मार्केट उघडताच सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव प्रतितोळा 50,600 च्या जवळ आला. (Gold Silver Latest Price Today)

Gold Silver Price Today
Petrol-Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 44 रुपयांनी कमी झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 50,680 रुपयांवर उघडपणे सुरू होता, मात्र बाजार सुरू होताच सोन्याचा भाव झटपट खाली आला. सोने आज 0.10 टक्‍क्‍यांनी आधीच्या बंद किमतीपेक्षा कमी आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर, सकाळी चांदीचा भाव 330 रुपयांनी घसरून 56,595 रुपये प्रति किलो झाला. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 56,777 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणीतील मंदीमुळे लवकरच किंमत आणखी खाली गेली. चांदी सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.58 टक्क्यांनी कमी आहे.

सोने ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

यूएस मार्केटमध्ये सोन्याची स्पॉट किंमत $1,734.97 प्रति औंसवर पोहोचली, जी सप्टेंबर 2021 नंतरची सर्वात कमी $1,722.36 प्रति औंस आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याने 2,000 डॉलर प्रति औंसची किंमतही ओलांडली होती. (Gold-Silver Price Hike Today)

Gold Silver Price Today
India Corona Update: देशात कोरोनाचे 13,615 नवीन रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या 1.31 लाखांच्या पुढे

सोन्याच्या दरात घसरण होत असतानाच जागतिक बाजारात चांदीची किंमत 0.30 टक्क्यांनी वाढून 19.14 डॉलर प्रति औंस झाली. याशिवाय प्लॅटिनमची स्पॉट किंमतही 0.7 टक्क्यांनी घसरून 863.82 डॉलर प्रति औंस झाली.

परकीय चलन बाजारात आज अमेरिकन डॉलरने 20 वर्षांचा उच्चांक गाठला आहे, त्याचा सोन्याच्या किमतीवर विपरीत परिणाम झाला. मोठ्या घसरणीसह सोने नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. जागतिक बाजारातील संकट कमी होऊन व्यापार सुधारला की, डॉलरची ताकदही कमी होईल आणि त्यानंतर सोन्याच्या भावात पुन्हा उसळी येऊ लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com