मुलांची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

पालकांनी मूलभूत कौशल्ये अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्यात रुजवली पाहिजे.
is your child not attentive follow these tips and increase listening skills
is your child not attentive follow these tips and increase listening skillsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टींच्या सवयी लावत असतो. आपण त्यांच्यामध्ये काही मूलभूत कौशल्ये अगदी सुरुवातीपासूनच रुजवली जातात त्यातील एक कौशल्य ऐकण्याचे.

हे देखील पहा -

आपण आपल्या मुलांना (Child) जोपर्यंत चांगला श्रोता बनवत नाही तोपर्यंत ते चांगले वक्ते बनणार नाही. पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त संवाद साधावा त्यामुळे मुले आपल्याशी बोलू लागतील त्यांना आपले ऐकण्याची सवय लागेल. मुलांनी त्यांच्या बालपणात ऐकण्याचे कौशल्य सुधारायला हवे ते सुधारायचे कसे हे जाणून घ्या.

या टिप्स फॉलो करा -

१. आपण आपल्या मुलांचे ऐकण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी त्यांना काही गोष्टी सांगू शकतो. तसेच गोष्टी त्यांना वाचून दाखवू शकतो किंवा त्यांना वाचायला सांगू शकतो. आपली मुले नेमके काय वाचतात, त्यांच्या शब्दांचा उच्चार पालकांनी तपासून पहा. वाचताना मुलांना गोष्टी संबंधीत प्रश्न विचारा. ज्यामुळे ते कितपित आपल्याला चांगले ऐकत आहेत आणि समजून घेत आहेत हे कळेल. त्यांना वाचणाची व ऐकण्याची आवड लागेल.

is your child not attentive follow these tips and increase listening skills
Parenting Tips : योग्य वयात मुलांना बचतीचे धडे द्या !

२. मुलांसोबत एखाद्या मनोरंजक विषयाच्या चर्चेत सामील व्हा त्यावर त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्यांच्या दिवसभरातील घटनांबद्दल विचारा. तसेच शाळा, त्यांच्या मित्रांबद्दल (Friends) किंवा त्यांना मनोरंजक वाटत असेल त्याबद्दल विचारू शकता. त्यामुळे आपला व मुलांचा संवाद वाढेल.

३. पालक (Parents) म्हणून जेव्हा मुलांचे ऐकण्याचे कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न आपण करतो तेव्हा सर्वात आधी आपण स्वत: कडे लक्ष द्यायला हवे. आपण मुलांचे ऐकले किंवा त्यांच्या दृष्टिकोनाला महत्त्व दिल्यास मुलांना ते आवडू लागते. त्यामुळे मुले आपल अधिक ऐकू लागतात. त्यासाठी आपण स्वतः एक चांगला श्रोता असणे आवश्यक आहे.

४. आपण मुलांसोबत अशा काही गोष्टी करु शकतो ज्यामुळे त्यांची ऐकण्याची कौशल्ये हळूहळू वाढण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मुलांसोबत ऑडिओबुक ऐकू शकतो याशिवाय त्यांना विशिष्ट खेळही खेळण्यास सांगू शकतो, ज्यामुळे त्याचे ऐकण्याचे कौशल्ये सुधारेल. यातून मुलांना काहीतरी शिकण्यास देखील मिळेल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com