Flipkart Bus Service: फ्लिपकार्टकडून ट्रॅव्‍हल ऑफरिंग्‍जमधील उपस्थितीमध्‍ये वाढ; अॅपवर बस बुकिंग्‍जचा शुभारंभ

Flipkart Has Rolled Out Bus Booking Service: फ्लिपकार्ट ग्राहकांना भारतभरातील २५,००० हून अधिक मार्गांवरील कनेक्‍टीव्‍हीटीसह १० लाख बस कनेक्शन्समधून निवड करण्‍याची सुविधा देईल.
Flipkart launched a bus booking app to expand travel offerings services
Flipkart launched a bus booking app to expand travel offerings servicesSaam Tv

Bus Booking Services By Flipkart:

फ्लिपकार्ट या भारतातील स्‍वदेशी डिजिटल कॉमर्स इकोसिस्‍टमने आपल्‍या अॅपवर (App) बस सेवा शुभारंभाची घोषणा केली आहे. विविध राज्‍य परिवहन महामंडळ व खाजगी समूहांसोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून फ्लिपकार्ट ग्राहकांना भारतभरातील २५,००० हून अधिक मार्गांवरील कनेक्‍टीव्‍हीटीसह १० लाख बस कनेक्शन्समधून निवड करण्‍याची सुविधा देईल.

फ्लिपकार्ट (flipkart) ट्रॅव्‍हल बॅनर अंतर्गत उपलब्‍ध असलेल्‍या विमान व हॉटेल बुकिंग (Booking) सेवांमध्‍ये ही भर करण्‍यात आलेली नवीन सेवा आहे. हे लाँच फ्लिपकार्टच्‍या विभागातील प्रवाशांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍याच्‍या योजनेच्‍या दिशेने उचलण्‍यात आलेले पाऊल आहे.

Flipkart launched a bus booking app to expand travel offerings services
WhatsApp वर येणाऱ्या या ४ मेसेजवर चुकूनही करु नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे!

फ्लिपकार्टचा विद्यमान ग्राहकवर्ग व बस प्रवासी यांच्‍यामधील समन्‍वयासह कंपनीचे किफायतशीर प्रवास सुविधा देण्‍याचे ध्‍येय स्‍पर्धात्‍मक स्थितीमध्‍ये गेम चेंजर ठरेल. बस बुकिंग्‍जसाठी सुपरकॉईन्‍सचे रिडम्‍प्‍शन अद्वितीय मूल्‍यवर्धित घटक आहे, जे नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी फ्लिपकार्टवर उपलब्‍ध आहे.

फ्लिपकार्टवरील बस बुकिंग सेवेची प्रमुख वैशिष्‍ट्ये म्‍हणजे उत्तम डील्‍सची उपलब्‍धता, कोणतेही सुविधा शुल्‍क किंवा इतर शुल्‍क नाही, जवळपास ५० रूपयांपर्यंत सुपरकॉईन्‍स रिडम्‍प्‍शनच्‍या माध्‍यमातून ऑफर्स (Offer) आणि २४/७ वॉईस हेल्‍पलाइन. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक १५ एप्रिल २०२४ पर्यंत करणाऱ्या प्रत्‍येक बस बुकिंगसाठी १५ टक्‍के सूटसह सुपरकॉईन्‍सवर ५ टक्‍के अतिरिक्‍त सूटचा आनंद घेऊ शकतात.

या नवीन विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत फ्लिपकार्टचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अजय वीर यादव म्‍हणाले, ''फ्लिपकार्टच्‍या व्‍यापक सेवांमध्‍ये बस बुकिंगचा समावेश प्रवासासह ग्राहकांच्‍या सर्व गरजांसाठी अल्टिमेट गंतव्‍य बनण्‍याच्‍या दिशेने आमच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे.

Flipkart launched a bus booking app to expand travel offerings services
Google वर सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? कंपनीचा मोठा निर्णय

द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमधील फ्लिपकार्टच्‍या प्रबळ उपस्थितीसह या उपक्रमाने आम्‍हाला ग्राहकांना त्‍यांच्‍या आंतरशहरीय प्रवास गरजांसाठी सोईस्‍कर व विश्वसनीय सोल्‍यूशन प्रदान करण्‍यास सक्षम केले आहे. ग्राहकांप्रती कटिबद्धतेसह आम्‍ही त्यांना मूल्‍यवर्धित सुविधांसह सेवा देत राहू, ज्‍यामुळे भविष्‍यात त्‍यांचा प्रवास अनुभव अधिक सुखकर होईल.

फ्लिपकार्ट फ्लाइट्स व हॉटेल्‍स २०१९ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून स्थिरगतीने विकसित होत आहेत. एकूण उद्योग स्‍तरावर प्रवासासाठी अत्‍यंत सकारात्‍मक दृष्टिकोनासह फ्लिपकार्ट सीमेवरील ग्राहकांना मूल्‍य प्रदान करत राहिल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com