Upcoming Two Wheeler: EICMA 2023 राहुल 'या' बाईक्सचा दबदबा; लवकरच भारतात होणार लॉन्च

Two Wheeler for India in EICMA 2023: EICMA 2023 राहुल 'या' बाईक्सचा दबदबा; लवकरच भारतात होणार लॉन्च
Upcoming Two Wheeler
Upcoming Two WheelerSaam Tv
Published On

Two Wheeler for India in EICMA 2023: 

यावर्षी EICMA 2023 मध्ये दुचाकी प्रेमींचा खूप उत्साह पाहायला मिळाला. कारण यात अनेक नवीन बाईक आणि स्कूटरचे प्रदर्शित करण्यात आले. यापैकी काही निवडक मॉडेल्सच भारतात येतील आणि आज आम्ही तुम्हाला EICMA मध्ये प्रदर्शित केलेल्या टॉप 5 दुचाकींबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होतील.

रॉयल एनफिल्ड हिमालयन इलेक्ट्रिक

नवीन हिमालयन 452 ने जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली असताना, रॉयल एनफिल्डने EICMA मध्ये ऑल-इलेक्ट्रिक हिमालयन कॉन्सेप्ट बाईक प्रदर्शित केली. सध्या ही बाईक विकसित केली जात आहे. तसेच याची टेस्ट देखील केली जात आहे. रॉयल एनफिल्डने आपल्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा केलेला नाही. पण ऑल-इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्ड लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Upcoming Two Wheeler
Netflix Free Subscription: 84 दिवस Netflix मोफत; 44 कोटी ग्राहकांची होणार मजा, सोबत 5G डेटाही मिळणार

हिरो झूम 160

Hero MotoCorp ने EICMA मध्ये अ‍ॅडव्हेंचर गियरने सुसज्ज झूम 160 सह अनेक आगामी उत्पादने प्रदर्शित केले. कंपनीच्या पहिल्या मॅक्सी स्कूटरमध्ये 160cc लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. जे 14bhp पॉवर आणि 13.7Nm टॉर्क जनरेट करते. पुढील वर्षी हे उत्पादन भारतात लॉन्च केले जाऊ शकते. (Latest Marathi News)

अल्ट्राव्हायोलेट F99

अल्ट्राव्हायोलेट F99 ही बाईक डिझाइन तसेच त्याच्या परफॉर्मन्ससाठी खूपच चर्चेत आहे. EICMA मध्ये प्रदर्शित केलेली ही बाईक केवळ ट्रॅक-ओनली मॉडेलसारखी दिसते, जी लिक्विड-कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे. ही बाईक 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड 265 किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो. कंपनीचा दावा केला आहे की, F99 जागतिक बाजारपेठेत 2025 मध्ये लॉन्च केली जाईल. भारतात ही बाईक कधी लॉन्च होणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Upcoming Two Wheeler
Indian Railways Rule: तिकीटाशिवाय रेल्वेने प्रवास करता येईल का? काय आहेत नियम? जाणून घ्या

कावासाकी निन्जा Z500

EICMA मध्ये Kawasaki ने Ninja 500 आणि Z500 सादर केली आहे. जी जे कंपनीच्या नवीन 451cc समांतर ट्विन इंजिनसह सुसज्ज आहेत. हे दोन्ही भारतात निन्जा 400 ची जागा घेतील. या 400 ते 650cc रेंजमध्ये ठेवल्या जातील. याबाबत अधिक तपशील नंतर उघड होऊ शकतो.

होंडा CB650R आणि CBR650R

Honda ने CBR600RR आणि CB1000 Hornet सोबत EICMA येथे 2024 650R रेंज सादर केली आहे भारतात CB1000 लॉन्च होण्याची फारशी शक्यता नाही. CB650R आणि CBR650R भारतात लॉन्च केले जातील, कारण या बाईक भारतात आधीच विकल्या जात आहेत आणि त्यांचे अपडेट मॉडेल देखील येथे विकले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com