Financial Planning Tips : उत्पन्न आणि कर्ज याचं ताळमेळ कसे बसवाल? भविष्य सुरक्षित करण्यासाठी 5 गोष्टी समजून घ्या

Budget For Financial Planning : तुमच्या उत्पन्नात बदल झालेले असताना अथवा कर्ज घेताना आर्थिक नियोजनांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.
Financial Planning Tips
Financial Planning Tips Saam Tv
Published On

Financial Planning :

तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आढावा घेणं गरजेचं आहे. विशेषत: आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा सुरुवातीला ही गोष्ट करणं गरजेचे आहे. परंतु याशिवाय तुमच्या उत्पन्नात बदल झालेले असताना अथवा कर्ज घेताना आर्थिक नियोजनांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. याबद्दल 5 महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींची मदत घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनची पुन्हा पाहणी करणे गरजेचे आहे असे सांगतात.

उत्पन्नात बदल झाल्यावर

तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करणाऱ्या म्हणजेच स्टॉक मार्केट, विमा, म्युच्युअल फंड अशा साधनांमध्ये अतिरिक्त पैसा (Money) गुंतवा. तसेच तुमचे जीवन आणि आरोग्य विमा संरक्षण वाढवा. अनावश्यक खर्च कमी करण्याबरोबरच उत्पन्न कमी झाल्यास किंवा थांबल्यास आधी केलेल्या बचतीचा वापर करण्यास प्राधान्य द्या.

Financial Planning Tips
Financial Planning : गुतंवणूकीसाठी 50-20-30 चा रुल फॉलो करा, पैशांची अडचण कधीच भासणार नाही

जीवनातील महत्त्वाचे टप्पे

लग्न, मुलाचा जन्म, शिक्षण (Education) अशा अनेक घटना आहेत ज्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यांसाठी पैसा कुठून येणार? कर्ज घेतले तर ते फेडण्याची काय व्यवस्था आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. याचा विचार तुमच्या नियोजनात पहिला केला पाहिजे. तुमचा जोडीदार, मुले आणि कुटुंब या सर्वांच्या गरजा तुमच्या नियोजनात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

कर्ज घेताना

मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज (Loan) घेतानाही फायनान्शियल प्लॅनिंगचा आढावा घ्यावा. शिक्षणानंतर मुलाला वेळेवर नोकरी मिळाली नाही तर, कर्जाचे परत फेड करण्याची काय व्यवस्था आहे? अशा परिस्थितींचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन तयार करण्याची गरज आहे.

मोठी खरेदी करताना

घर किंवा कार खरेदी करणे ही बहुतेक अनेक सामान्यांसाठी मोठी खरेदी असते. यासोबतच यासंबंधीचा खर्चही वाढतो. कर्जाची परतफेड, देखभाल खर्च आणि विमा यासाठी अतिरिक्त पैशांची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक नियोजनचा आढावा घेणे आवश्यक आहे.

Financial Planning Tips
Chanakya Niti On Financial Problem : पैसे असे खर्च करा की कधीच कमतरता भासणार नाही, पाहा चाणक्य नीती काय सांगते

वय वाढते

जसे आपले वय वाढत जाते तसेच आजारांचा धोका वाढतो. ठराविक वेळेनंतर तुमच्या निवृत्ती फायनान्शियल प्लॅनिंगचे पुन्हा तपासणी करणे महत्त्वाचे आहे. वाढत्या महागाईशी जुळवून घेण्याबरोबरच आरोग्य आणि आयुर्विम्याचे संरक्षण वाढवण्याचाही विचार केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com