नागपूर : फटाके Fire Crackers म्हटलं की कानठळ्या बसविणारा आवाज आणि धूर एवढंच आपल्याला माहीत आहे. मात्र, असे काही फटाके आहेत ज्यातून धूर आणि आवाजाऐवजी रोपटी निघतात. ग्रीन क्राफ्ट प्रोजेक्ट अंतर्गत काही तरुणांनी एकत्र येऊन हे फटाके तयार केले आहेत. या ग्रीन फटाक्यांच्या माध्यमातून पर्यावरण Environment संतुलन आणि रोजगार Employment निर्मिती असा दुहेरी उद्देश साधला गेलाय. Nagpur Youth produced environment friendly crackers
खरेतर हे काही सामान्य फटाके नाहीत. मुळात हे फटाकेच नाहीत, तर हे आहेत बिया भरलेले सीड बाॅल्स Seed Balls.. त्यातून धुर, आवाजाच्या प्रदूषणाएवजी झाडं उगवतील. ग्रीन आर्ट क्राफ्ट प्रोजेक्ट अंतर्गत मित्रांनी एकत्र येत हे ग्रीन फटाके तयार केले आहेत. फटाक्यांमुळं ध्वनी आणि वायू प्रदूषण Air Pollution तर होतच शिवाय पशु पक्षांनाही याचा मोठा त्रास होतो. एकदा अशाच एका दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे झाडावर असलेले पक्षी खाली पडत होते. ते पाहून मन सुन्न झालं आणि ग्रीन फटाक्यांची संकल्पना या तरुणांना सुचली
ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश सीमेवर छिंदवाडा जिल्ह्याच्या पारडसिंगा गावातील शेकडो महिलांना हे फटाके तयार करण्याचे ट्रेनिंग दिलं. त्यातून या गावातील महिलांना रोजगार मिळाला. ग्राम आर्टच्या श्वेता भट्टड आणि तन्मय जोशी यांनी ही माहिती 'साम टिव्ही'ला दिली. Nagpur Youth produced environment friendly crackers
फटाक्यांचा वापर टाळण्यासाठी काही राज्य सरकारांनी फटाक्यांवर बंदी सारखे निर्णय घेतले आहेत. मात्र, तरीही नागरिक फटाके फोडणं बंद करत नाहीत. त्यामुळं ग्राम क्राफ्ट संस्थेनं हे पर्यावरण पूरक फटाके तयार केलेत. पर्यावरण समतोल राखायचा असेल तर या ग्रीन फटाक्यांना स्वीकारायला हवं.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.