Egg White Or Brown : पांढरी अंडी की ब्राऊन? आरोग्यासाठी कोणती अंडी चांगले आहेत जाणून घ्या

Which Egg Best : अंडयाडमध्ये विविध प्रकारचे पोषकघटक असतात. अंडी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.
Egg White Or Brown
Egg White Or BrownSaam Tv

Eggs Benefits : अंडयाडमध्ये विविध प्रकारचे पोषकघटक असतात. अंडी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात. वजन नियंत्रत राहण्यासाठी अंडी फायदेशीर आहेत. त्यासोबतच ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडी आहेत.

व्हिटॅमिन, प्रोटीन,पोटॅशियम, कॅलरीज, कार्बोहायड्रेट असे बरेच गुणधर्म अंड्यांमध्ये आढळतात. मात्र आपल्या येथे बाजारात दोन रंगांची अंडी मिळतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना असे वाटते की तपकिरी अंडी अधिक पौष्टिक असतात. परंतु अनेक वैज्ञानिक रिसर्चमध्ये (Research) या गोष्टीला अनुमती दिली नाही.

Egg White Or Brown
Eggs Harmful For Heart : कोलेस्ट्रॉलसाठी अंडी फायदेशीर पण हृदयासाठी घातक? जाणून घ्या

दोन्ही अंडी (Eggs) वरून जरी वेगवेगळ्या रंगाची दिसले तरी उकळल्यानंतर ती सारखीच दिसतात. आपल्याला 78 टक्के कॅलरीज 50 ग्रॅम अंड्यामधून मिळतात. त्यामध्ये 5.3 ग्रॅम फॅट, 6.29 ग्रॅम प्रोटीन, 0.56 कार्बोहायड्रेट्स त्यासोबतच 20 मिलिग्रॅम कॅल्शियम, 63 मिलीग्राम पोटॅशियम, 86 मीलिग्राम व्हिटॅमिन, 55 मिग्रॅफोर्स, 0.56 मिलिग्रम लोह, व्हिटॅमिन बी9 असते.

तथापि अंड्याचे पोषणमूल्य कोंबडीची जात आणि कोंबडी ज्या वातावरणात वाढली आहे त्यानुसार बदलू शकते. कोंबड्यांची योग्य काळजी घेतल्याने त्यांची अंडी इतर अंड्यांपेक्षा पौष्टिक आणि श्रेष्ठ असतात. त्यामुळे अंड्याचा रंग नसून अंड्याचे पोषण हे कोंबड्यांच्या आहारावर अवलंबून असते.

Egg White Or Brown
Eggs Harmful For Heart : हृदयाच्या आरोग्यासाठी अंडी खाणे चांगले की वाईट? जाणून घ्या

जर दोन्ही रंगाच्या अंड्यांचे पौष्टिक मूल्य जवळपास सारखेच असेल तर ब्राऊन रंगाच्या अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा दुप्पट भावाने का विकली जातात? असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिकच आहे.

तर फार पूर्वी जेव्हा ब्राऊन कोंबडींची कमतरता होती, तेव्हा अंड्यांचा पुरवठा नियंत्रण राहण्यासाठी ब्राऊन रंगाच्या अंड्याची किंमत वाढवण्यात आली होती. परंतु आता दोघांच्या किमतीत भरपूर अंतर्गत नसून जवळपास समानच किंमत आहे. अंड्याची किंमत कोंबडीची जात, आहार आणि वातावरणानुसार कमी-जास्त होत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com