Drinking Liquor : दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण आजच्या संस्कृतीत केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया देखील अति प्रमाणात दारूचे सेवन करतात. पण याचा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
जेव्हा कधी पार्टी करायची असते किंवा एखाद्याचा मूड ऑफ असतो तेव्हा तो सर्वात आधी दारूचे सेवन करतो. दारू पिण्याची क्रेझ पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येही वाढत आहे. वीकेंडची पार्टी असो किंवा मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करणे असो, आजकाल महिलाही (Women) दारूचे प्रमाणाबाहेर सेवन करतात. पण जास्त मद्यपान केल्याने त्यांच्या योनीच्या आरोग्यावर आणि लैंगिक क्षमतेवरही परिणाम होतो. महिलांसाठी दारू (Liquor) पिणे किती हानिकारक हे पाहूयात.
योनीमार्गात कोरडेपणा -
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात निर्जलीकरण होते आणि जेव्हा स्त्रिया जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतात तेव्हा त्यांना योनीमार्गाच्या कोरडेपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्यांना संसर्ग, खाज सुटणे, लालसरपणा यासारख्या समस्या होऊ शकतात.
लैंगिक इच्छा कमी करा -
जेव्हा कोणी दारूचे सेवन करते तेव्हा त्याची लैंगिक उत्तेजना आणि कामवासना वाढते. पण नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, जास्त प्रमाणात किंवा दररोज मद्यपान केल्याने लैंगिक संबंधांमध्ये रस नसणे, लैंगिक उत्तेजनाची कमतरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
गर्भवती महिलांसाठी अल्कोहोल विषापेक्षा कमी नाही -
गर्भधारणेदरम्यान अल्कोहोल पिणे केवळ स्त्रीलाच नाही तर न जन्मलेल्या बाळाला देखील त्रास देऊ शकते आणि मानसिक विकारांशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात, म्हणून डॉक्टर आणि तज्ज्ञ सल्ला देतात की गर्भधारणेचा प्रयत्न करणारे लोक किंवा गर्भवती महिलांनी दारूचे सेवन अजिबात करू नये. एवढेच नाही तर महिलांनी स्तनपान करताना देखील दारूचे सेवन करू नये.
या आजारांचा धोका असू शकतो -
दारूच्या सेवनाने महिला आणि पुरुषांना अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: महिलांबद्दल बोलायचे झाल्यास, अति प्रमाणात मद्यपान केल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या समस्यांचा धोका वाढतो. यासोबतच तणाव, सेक्स पॉवर कमी होणे आणि वंध्यत्वाच्या समस्याही उद्भवू शकतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By : Shraddha Thik
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.