Double Chin : वाढलेल्या चिनमुळे जडू शकतात आजार, वेळीच आहारातील 'या' पदार्थांना वगळा

सामान्यतः मध्यम वयाकडे वाटचाल करत असताना चेहऱ्यावर चरबी वाढू लागते.
Double Chin
Double ChinSaam Tv

Double Chin : वाढलेल्या वजनाबरोबरच आपल्या हनुवटीच्या खालच्या भागाची देखील चरबी वाढते. अनेक तरुण पिढी या वाढलेल्या डबल चिनने त्रस्त आहेत. वाढलेले डबल चीन हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जाते. सामान्यतः मध्यम वयाकडे वाटचाल करत असताना चेहऱ्यावर चरबी वाढू लागते. म्हणूनच बहुतेक लोक ते टाळण्याचा प्रयत्न करतात.

शरीरातला लठ्ठपणा वाढला की त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसू लागतो. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. काही लोक चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात परंतु, फक्त व्यायाम करुन फरक दिसत नाही. हल्लीची पिढी सतत बाहेरच्या खाण्यावर अधिक भर देते ज्यामुळे त्यांच्या हनुवटीच्या खालचा भाग वाढतो. त्यासाठी व्यायामासोबतच आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलायला हव्या.

त्यासाठी आहारातून (Food) कोणते पदार्थ वगळायला हवे हे जाणून घेऊया सर्वप्रथम हेल्दी फूडला तुमच्या दैनंदिन जीवनाची सवय लावा, तसेच खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आहेत ज्या आहार यादीतून वगळणे महत्त्वाचे ठरेल.

Double Chin
Weight Loss : वजन कमी करायचे आहे ? तर, दुपारच्या जेवणात 'या' 3 पदार्थांना करा बाय बाय!

1. ब्रेड

Bread
Bread Canva

आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना सकाळच्या नाश्त्यात ब्रेड खायला आवडते, कारण त्यामुळे जास्त मेहनतही लागत नाही आणि वेळही वाचतो, परंतु याचे सेवन केल्यास चेहऱ्याची चरबी वाढते. त्यामुळे टोस्ट आणि सँडविचसारख्या गोष्टी नाश्त्यामधून वगळा.

2. तेलकट पदार्थ

Oily Food
Oily FoodCanva

आपल्यापैकी बहुतेकांना तेलकट (Oil) पदार्थ खायला आवडतात, ते कितीही चविष्ट असले तरी दुहेरी हनुवटी येण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच तेलाने युक्त अन्न कमीत कमी खाणे चांगले.

3. सोया सॉस

Soya Sauce
Soya Sauce Canva

नूडल्स चविष्ट बनवण्यासाठी आपण अनेकदा त्यात सोया सॉस घालतो, पण त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपले शरीर फुगलेले वाटते. त्यामुळे दुहेरी हनुवटी टाळण्यासाठी सोया सॉसचे सेवन बंद करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com