Food For Thyroid : थायरॉईडमुळे पोटावरील चरबी वाढते? झटपट कमी करण्यासाठी तुमच्या आहारात 'या' 5 पदार्थांचा समावेश करा!

महिलांनमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्ती दिसून येते.
Food For Thyroid
Food For Thyroid Saam Tv

Food For Thyroid : महिलांनमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्ती दिसून येते. गळ्याच्या आत खालील बाजूस एक लहान ग्रंथी असते त्यातून मिळणारे हार्मोन्स आपल्याला शरीरासाठी महत्वाचे असतात.त्यामुळे थायरॉईड व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम पूर्ण बॉडी वर होत असतो.

तसेच जलद गतीने वजन देखील वाढत असते. तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रित आणायचे असेल तर या काही पदार्थांचा (Food) तुमच्या आहारात (Diet) समावेश करा. नक्कीच काही दिवसात वजन कमी झालेले तुम्हाला जाणवेल.

Food For Thyroid
Thyroid Problem : तुम्हालाही थायरॉईडची समस्या आहे ? 'या' 5 प्रकारचे तेल ठरेल फायदेशीर !

नट्स आणि बिया -

भोपळ्याच्या बिया ,चीय बिया यांचा तुमच्या आहारात समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. तसेच बदाम,काजू,अक्रोड सकाळी उठून खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व मिळत असतात. मेवा मध्ये झिंक आणि सेलेनियम प्रमाण खूप चांगले असते. ते थायरॉईड वर काम करण्यास खूप उपयुक्त आहे.

मसूर आणि बीन्स -

मसूर आणि बीन्समध्ये प्रथिने असते जे थायरॉईड रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे असते. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी मसूर मदत करते. वजन कमी करण्यासाठी बीन्स आणि मसूर फायदेशीर आहे. या दोन पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास तुमच्या वजनात काही दिवसात फरक जाणवेल.

कॅफिन मुक्त पेय आणि भरपूर पाणी पिणे -

जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर कॅफेनमुक्त पेय निवडा हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. जास्त पाणी पिल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात,जळजळ कमी होणे ,शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढणे यासारखे समस्या जास्ती पाणी पिल्याने कमी होतात.

Food For Thyroid
Thyroid : थायरॉईड नियंत्रीत ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा

आहारात अंडीचा समावेश करा -

थायरॉईडच्या त्रासामुळे लठ्ठपणा आला असेल तर तुमच्या आहारात अंडी चा समावेश करा त्याने तुमच्या तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल अंड्याच्या पिवळ्या ब्लक मध्ये भरपूर प्रमाणात झिंक,सेलेनियम आणि प्रथिने आढळतात जे थायरॉईडचे कार्य सुधारतात.

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा -

हिरवा पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रथिने, अँटिऑक्साइड असतात. जे थायरॉईड साठी फार महत्त्वाचे असते यासोबतच तुमचे वजन वाढण्यापासून रोखते.टोमॅटो, शिमला मिरची,मुळा,कोबी,पालक,मेथी या पालेभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करून तुम्ही वजन कमी करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com