

Physical Relationship : जगात प्रसिद्ध असलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यातीलच एक सांडेचं तेल. सांडेचं तेल लावल्याने लैंगिक क्षमता वाढवते असं म्हटलं जातं. बाजारात अनेक ठिकाणी हे तेल काचेच्या बाटलीतून काही बाबा विकताना दिसतात. (Latest Physical Relationship News)
भारतातही अनेक ठिकाणी हे तेल सहज उपलब्ध आहे. कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी व्यक्ती वैद्याची मदत घेतात. अनेक वेळा गुप्त आजार किंवा लैंगिक समस्या असल्यास व्यक्ती डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात. रस्त्यावर जडीबुटी घेऊन बसलेल्या बाबांवर अनेकजण विश्वास ठेवतात. तुमचा आजार नक्की ठीक होणार यासाठी हे बाबा विविध उदाहरणे देखील देतात. तसेच तुम्ही कसे बरे व्हाल या बाबत तुम्हाला पटवून सांगितलं जातं. यात सांडेचं तेल जास्तीत जास्त विकलं जातं.
या तेलाने सांड म्हणजे वळू किंवा बैलासारखी ताकत येते का?
पहिले तर हे समजून घ्या की, सांडेचं तेल म्हणजे वळू किंवा अन्य कोणत्याही प्राण्याचं तेल नाही. हे तेल आहे 'सारा हार्डविकी' नावाच्या पालीचं. ही पाल साधारणता वाळवंट प्रदेशात आढळते.ही पाल इतर सामान्य पालींच्या तुलनेत मोठी आणि जाड असते. तिच्या शेपटीच्या शेवटी एक पिशवी असते. त्या पिशवीमध्ये असलेल्या पदार्थाला तापवून तेल बनवले जाते.
ही पाल वाळवंटात आतमध्ये खोल जाऊन बसते. मात्र वाळवंटातील व्यक्ती तसे असले तरी पालीला शोधून काढू शकतात. काही लोक त्यांचे तेल विकताना रस्त्यावर बसलेले दिसतात. हे तेल रोज विकले जात नाही. त्यामुळे त्यासाठी पाली जिवंत ठेवणे गरजेचे असते. यासाठी सांडे तेल विक्रेते या पालींच्या मानेवर वार करतात. यात त्यांच्या मानेचा मनका तुटतो आणि त्या नेहमीसाठी अपंग होतात. त्यामुळे त्या विक्रेत्यांना पालीला कितीही काळ जिवंत ठेवता येतं.
सांडेच्या तेलाने लैंगिक क्षमता वाढते का?
सांडेचं तेल कामोतेजनासाठी वापरले जाते असं म्हणतात. मात्र हे सपशेल खोटं आहे. पालीच्या तेलाने असं काही होतं नाही. मात्र तरीही अनेक व्यक्ती रस्त्यावर बसलेल्या भोंदू बाबांवर विश्वास ठेवतात. यामुळे या पालींची ही जात आता संपुष्टात येत चालली आहे. पालींप्रमाणे असे अनेक प्राणी आहेत. ज्यांचा अशा पद्धतीने जीव घेतला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.