Gym Side Effects : जीम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसताय? ठरु शकते जीवघेणे

Gym Side Effects Symptoms : व्यायाम केल्याने शरीर तंदुुस्त राहते आणि स्टॅमिना, स्टॅबिलिटी , पोस्चर सुधारते.
Gym Side Effects
Gym Side Effects Saam Tv

Gym Effects : व्यायाम केल्याने शरीर तंदुुस्त राहते आणि स्टॅमिना, स्टॅबिलिटी , पोस्चर सुधारते. मात्र काही वेळेस जिम करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त व्याम करत असाल तर त्याला ओव्हरट्रेनिंग म्हणतात.

तुम्ही जेव्हा ओव्हरट्रेनिंग करता तेव्हा शरीर त्याबद्दल काही सिग्नल देते. तेव्हा या चिन्हाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अथवा स्नायूंना खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे ओव्हरट्रेनिंगच्या हे 3 लक्षणे (Symptoms) कायम लक्ष्यात ठेवा.

Gym Side Effects
Heart Attack In Gym : व्यायाम करताना २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

ओव्हरट्रेनिंग कशाप्रकारे होते?

ओव्हरट्रेनिंग म्हणजे तुम्ही व्यायामनंतर स्नायूंना आराम करण्यासाठी वेळ देत नाही. असे NCBI यांचे म्हणणे आहे. एक्सरसाइजच्या दोन सेशनच्या मध्ये विश्रांती घेणे गरजेचे आहे. विश्रांती तुमच्या वर्कआउटच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

1. स्नायूंमध्ये वेदना -

व्यायामानंतर स्नायूंमध्ये होणाऱ्या तीव्र वेदना ओव्हरट्रेनिंगचे लक्षण असू शकते. डिजिटल (Digital) क्रिएटर आणि फिटनेस ट्रेनर नवज्योत सिंग यांच्या मते, वर्कआउट केल्यानंतर 3-4 दिवसांपर्यंत सुजन आणि वेदना दूर होत नाहीत तर हे ओव्हरट्रेनिंगचे लक्षण आहे.

Gym Side Effects
Nalasopara : Gym Trainer तरुणाचा श्वास कोंडला आणि अनर्थ घडला!

2. मध्यरात्री जाग येणे -

जेव्हा तुम्ही खूप वर्कआउट करतो. तेव्हा गाढ झोप येत नाही. परिणामी स्नायू आणि शरीराला आराम देण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी झोप मिळत नाही. ज्यामुळे स्नायूंवरील अधिक प्रमाणात ताण वाढतो आणि शरीराला इजा होऊ शकते.

3. सौम्य सांधेदुखी -

वर्कआउट करताना आपल्या सांध्यावर प्रेशर असते. त्यामुळे जे लोक फार सिंगल-जॉइंट किंवा मल्टी-जॉइंट एक्ससाइज करतात, त्यांच्या सांध्यामध्ये थोडाफार त्रास होतो आणि हळूहळू सांधेदुखीचा त्रास वाढ जातो.

4. ओव्हरट्रेनिंगचे इतर लक्षणे -

- प्रतिकारशक्ती कमी होणे

- दिवसभर थकवा जाणवणे

- मसल्स वाढत नाहीत

- जेवण करण्याची इच्छा नाही

- मसल्स कमी होणे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com