Disadvantages of Wearing Sweater at Night : तुम्ही देखील रात्री स्वटेर घालून झोपताय ? उद्भवू शकतात आरोग्याच्या 'या' समस्या

रात्री स्वेटर परिधान केल्याने शरीरात खाज येऊ शकते.
Disadvantages of Wearing Sweater at Night
Disadvantages of Wearing Sweater at NightSaam Tv

Disadvantages of Wearing Sweater at Night : रात्री स्वेटर परिधान केल्याने शरीरात खाज येऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरात रॅशेस देखील होऊ शकतात.

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण स्वेटर घालतो. जर खूप थंडी वाजत असेल तर ते एक नाही तर दोन स्वेटर घालतात. या ऋतूमध्ये लोक कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालतात.

पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत उबदार कपडे परिधान केल्यास तुम्हाला थंडीपासून वाचवता येते, जर तुम्ही रात्री अनेक स्वेटर घालून झोपत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, लोकरीचे कपडे जाड असतात, जे परिधान केल्याने आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडू शकत नाही.

Disadvantages of Wearing Sweater at Night
Maharashtra Winter session 2022 : विरोधी पक्षनेते अजित पवार Live; विधानसभा कामकाज Live | SAAM TV

अशा स्थितीत शरीरातील रक्ताभिसरणावर खूप वाईट परिणाम होतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रात्री लोकरीचे कपडे घालून झोपल्याने तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया थंडीच्या दिवसात उबदार कपडे घालून झोपल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो.

रात्री उबदार कपडे घालून झोपणे हानिकारक ठरू शकते -

काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते. अशा परिस्थितीत काही लोक रात्री स्वेटर घालून झोपतात. पण तुम्हाला माहित आहे का की रात्री स्वेटर घातल्याने शरीरात खाज येऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरात रॅशेस देखील होऊ शकतात.

Disadvantages of Wearing Sweater at Night
Winter Care Tips : हिवाळ्यात डोकेदुखी का होते ?

कारण जाड उबदार कपडे फायबरचे बनलेले असतात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण थांबते. याचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. लोक रात्री ब्लँकेट घालून झोपतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही लोकरीचे कपडे घालूनही झोपत असाल तर तुम्हाला रात्री अस्वस्थता आणि गुदमरल्यासारखे वाटू शकते.

लक्षात ठेवा उबदार कपडे ऑक्सिजन रोखण्याचे काम करतात. याशिवाय ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांनी रात्री स्वेटर घालणे पूर्णपणे टाळावे. कारण लोकरीचे कपडे घालून झोपल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही.

लोकरीचे कपडे परिधान केल्याने शरीरातील रक्ताभिसरण थांबते -

जर तुम्हाला रात्री खूप थंडी वाटत असेल तर उबदार कपडे घालण्याऐवजी तुम्ही जाड ब्लँकेट किंवा रजाई निवडू शकता. जेणेकरून थंडीपासून वाचता येईल आणि शरीराला कोणतीही हानी होणार नाही.

उबदार स्वेटर घालणे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हानिकारक असू शकते. याशिवाय रात्रीच्या वेळी स्वेटर घातल्याने त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो, कारण अनेकांना लोकरीच्या ऍलर्जीची समस्या असते आणि तुमची त्वचा जास्त काळ लोकरीचे कपडे सहन करू शकत नाही.

जे लोक मधुमेही आहेत, विशेषत: त्यांना उबदार कपडे घालण्याची समस्या देखील असू शकते, जसे की रात्री चक्कर येणे किंवा अस्वस्थता. म्हणूनच सकाळपासून संध्याकाळपर्यंत उबदार कपडे घालण्याचा प्रयत्न करा, रात्री फक्त मऊ आणि हलके कपडे निवडा. रात्री उघडे आणि सैल कपडे तुम्हाला अधिक आराम देतात आणि तुम्हाला चांगली झोपही लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com