Shani Dev: साडेसाती काळातही शनिची कृपा होणार, शनिवारी हे उपाय करा

शनिवारी (Saturday) काही उपाय केल्यास शनिचा प्रकोप कमी होऊ शकतो.
Shani Dev
Shani DevSaam Tv
Published On

मुंबई: ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिलमध्ये शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. शनिदेव आपली राशी बदलून कुंभ राशीत येत आहे. अशा स्थितीत साडे सातीचा सर्व राशींवरील प्रभावही बदलणार आहे. अशा स्थितीत शनिवारी (Saturday) काही उपाय केल्यास शनिचा प्रकोप कमी होऊ शकतो. यासोबतच जीवनातील त्रास कमी होऊ शकतात. जाणून घेऊया शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे त्याबाबत -

Shani Dev
Saturday Tips: शनिवारी या गोष्टी दृष्टीस पडणे असते शुभ, समजून जा 'अच्छे दिन' येणार

शनि यंत्राची पूजा करावी

शनि यंत्राची (Shani Yantra) पूजा केल्याने शनिदोषापासून (Shani Dosh) मुक्ती मिळू शकते. यासाठी शनिवारी स्नान केल्यानंतर काळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घालावे. यानंतर शनिदेवाची विधीवत पूजा करावी. शक्य असल्यास शनियंत्राची पूजा करावी. असे केल्याने नोकरी, व्यवसाय आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात, असे मानले जाते.

भगवान शिवाची पूजा

शास्त्रानुसार भगवान शिव (Lord Shiva) हे शनिदेवाचे गुरु आहेत. अशा स्थितीत शनिवारी भगवान शंकराची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. याशिवाय, शनिवारचा दिवस हनुमानजींच्या पूजेसाठीही विशेष मानला जातो. असे मानले जाते की शनिवारी हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केल्याने शनिच्या प्रत्येक त्रासातून मुक्ती मिळते. तसेच, जीवनातील प्रगतीचा मार्ग सुकर होतो.

तेल दान करावे

शनिवारी तीळ किंवा मोहरीच्या तेलाचे दान केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो असे मानले जाते. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल खाऊ घातल्याने धन वाढते. याशिवाय, शनिवारी शनि मंदिरात (Temple) मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदोष दूर होऊ शकतो.

(टीप - वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com