Health issue, Sleeping problem, exercise for better sleep
Health issue, Sleeping problem, exercise for better sleep ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sleep Tips : चांगली झोप येण्यासाठी हे व्यायाम करा!

शांत झोप येण्यासाठी कोणता व्यायम कराल ?

मुंबई : झोप येण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. एक्सरसाइज केल्यामुळे झोप लवकर येऊन ती शांत पध्दतीने लागते. तसेच झोपेचे प्रमाणही चांगले राहाते. (exercise for better sleep)

हे देखील पहा -

वारंवार झोप मोडली जात असेल किंवा झोप येत नसेल तर आपण अधिक एक्सरसाइज करण्यापेक्षा स्ट्रेचिंग व ध्यानधारणा करणे जास्त फायदेशीर ठरेल. जड व्यायाम केल्याने हृदयगती व शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे झोप येण्यात अडचणी निर्माण होतात. तेच स्ट्रेचिंग व योग केल्यामुळे शरीराला शांत करणाऱ्या हार्मोन्सचा प्रवाह वाढतो. झोप चांगली येण्यासाठी आपण कोणता व्यायाम करायला हवा हे जाणून घेऊया. (Healthy Sleeping tips in Marathi)

१. काऊ पोझ ही आपण दोन ते तीन वेळा (Time) करु शकतो. फरशीवर गुडघे व हात टेकवून टेबलासारखी पोझिशन बनवून घ्या. हा व्यायाम केल्याने पोटाचा व मानेचा ताण कमी होतो.

Health issue, Sleeping problem, exercise for better sleep
प्रवासात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

२. चाइल्ड चाइल्ड पोझ या अवस्थेत खोल श्वास घेत राहा. दोन ते तीन मिनिटे आपण हे करू शकता. हे करताना गुडघ्यांवर बसून पुढे झुका. छाती मांड्यांमध्ये न्या. पायांचे अंगठे आपसात जुळवा. गुडघ्यांमध्ये एवढे अंतर असावे की, आपण सहजतेने श्वास घेऊ शकाल. आपले हात समोर जमिनीलगत व कपाळ जमिनीला टेकेल एवढे दूर पसरा. हलक्या मसाजासाठी टेनिस बॉल वा मसाज बॉल कपाळाखाली ठेवून हळूहळू तो एकीकडून दुसरीकडे फिरवत राहा. असे केल्याने डोके शांत होण्यास फायदा (Benefits) होईल.

३. लो लाउंज या पोझिशनमध्ये ५ ते १० वेळा खोल श्वास घ्या. उजवा पाय पुढे करून घ्या. डावा गुडघा मागे न्या. दोन्ही हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. हा एक्सरसाइज एका विशिष्ट प्रकारचे स्नायूंसाठी आहे. हे स्नायू पाठीचा कणा व पायांना जोडतात. स्नायू चालायला व पळायला मदत करतात. आपल्या आतील अवयवांना व डायफ्रामला मदत करतात. आपल्या श्वसनाच्या हालचालींवर सरळ परिणाम करतात. हा व्यायाम केल्याने आपल्या झोप लगेच व शांत लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com