Period Hacks : मासिक पाळीदरम्यान या चुका करु नका अन्यथा होईल मोठे नुकसान!

मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर महिलांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
Do not make these mistakes during menstruation, how to take care during periods, Period Hacks
Do not make these mistakes during menstruation, how to take care during periods, Period Hacksब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मासिक पाळीचे चक्र हे प्रत्येक महिन्याला सुरू असते. ही एक नैसर्गिक क्रिया असून त्याला प्रत्येक महिलेला सामोरे जावे लागते. (how to take care during periods)

हे देखील पहा-

मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर महिलांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्याचा मासिक पाळीवर विशेष परिणाम होतो. मासिक पाळी दरम्यान केलेल्या अनेक चुकांमुळे पोटांचे अनेक आजार उद्भवू शकतात. अशावेळी आपण असे पदार्थ (Food) खाणे टाळले पाहिजे ज्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास सुरू होईल. विशेषत: या दरम्यान खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरातील हार्मोन्स बदलत असतात. अधिक ताणतणाव येणे, चिडचिड होणे, ओटीपोटीत दुखणे किंवा खाण्याकडे दुर्लक्ष होते. मासिक पाळीदरम्यान शरीराच्या (Health) काळजीसोबत आपण काही अशा गोष्टी करणे टाळायला हवे ज्याचा वाईट परिणाम आपल्याला सहन करावा लागू शकतो.

१. मासिक पाळीदरम्यान आपण शरीरसंबंध ठेवणे चुकीचे आहे. बऱ्याच महिलांना असे वाटते मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्याने आपण गर्भवती होऊ शकत नाही. परंतु, असे केल्याने गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते. या दरम्यान संबंध ठेवल्याने संसर्ग होऊ शकतो.

Do not make these mistakes during menstruation, how to take care during periods, Period Hacks
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम विषयी असणारे समज व गैरसमज जाणून घ्या

२. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासामुळे आपल्याला जेवणाची इच्छा होत नाही. त्यामुळे अशावेळी आपण जेवणासाठी टाळाटाळ करतो. या काळात महिलांचे शरीर अधिक कमकुवत असते. यादरम्यान आपण अधिक पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे.

३. मासिक पाळीदरम्यान पाठ दुखीचा त्रास जाणवत असेल तर अशावेळी शारीरिक श्रम करणे टाळायला हवे. अन्यथा अधिक त्रास जाणवू शकतो.

४. मासिक पाळीदरम्यान आपण सॅनेटरी पॅड कितीवेळा बदलतो हे देखील महत्त्वाचे आहे. यावेळी आपण निदान सहा तासांनी पॅड बदलणे गरजेचे आहे.

५. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर अधिक घट्ट कपडे घालू नये त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. अशावेळी सैल कपडे घातल्यास आरामदायी वाटेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com