Mens Health: मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो, जाणून घ्या यामागील कारण

Diabetes Awareness: जगभरातील पुरुषांना महिलांपेक्षा उच्च रक्तदाब, मधुमेह आणि एचआयव्ही/एड्समुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे.
Mens Health
Mens Healthfreepik
Published On

जीवनशैली आणि आहारातील अनियमिततेमुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे, आणि या समस्यांचा धोका तरुणांमध्ये देखील वाढला आहे. चिंताजनक बाब म्हणजे २० वर्षांखालील लोकांमध्ये ही समस्या झपाट्याने वाढते आहे. आरोग्य तज्ञ लहानपणापासूनच योग्य काळजी घेण्याची शिफारस करतात. अलिकडच्या एका अहवालानुसार, पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढला आहे, ज्यामुळे त्यांच्यात मृत्यूचा धोका देखील जास्त आहे.

Air Conditioner Effects: उन्हाळ्यात एसीचा वापर वाढला! पण त्याच्याशी संबंधित आरोग्याला होणारे परिणाम कोणते? वाचा

कोणत्या सवयी जबाबदार असल्याचे आढळले?

- पुरुषांमध्ये धूम्रपान करण्याची सवय जास्त असते.

- महिलांमध्ये लठ्ठपणा आणि असुरक्षित लैंगिक वर्तनाची शक्यता जरी जास्त असली तरी, त्या डॉक्टरांकडे जास्त वेळा जातात, ज्यामुळे रोगांचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार होतात.

- १३१ देशांमध्ये (६४%) पुरुषांचे एचआयव्ही/एड्समुळे महिलांपेक्षा जास्त मृत्यू झाले, असे मृत्युदराच्या बाबतीत दिसून आले.

Mens Health
Skin Care Tips: हवेमुळे त्वचा कोमजलीये? चेहऱ्याच्या काळजीसाठी मुलतानी माती आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या फायदे

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आता सामान्य असले तरी ते अत्यंत धोकादायक आहेत आणि आरोग्य सेवांवर दबाव निर्माण करतात. याचा प्रबोधन करण्यासाठी लहानपणापासून संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी वजन राखणे आवश्यक आहे. अल्कोहोल कमी करा, धूम्रपान टाळा आणि तणावावर नियंत्रण ठेवा. अशा साधारण उपायांनी या समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com