डेल्टा, ओमिक्रॉनंतर अजून किती कोरोना प्रकार; शास्त्रज्ञांनी दिली चेतावनी

जगभरात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता शास्त्रज्ञांनी अनेक इशारे दिले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन हा कोरोनाचे शेवटचा प्रकार असणार नाही.
डेल्टा, ओमिक्रॉनंतर अजून किती कोरोना प्रकार; शास्त्रज्ञांनी दिली चेतावनी
डेल्टा, ओमिक्रॉनंतर अजून किती कोरोना प्रकार; शास्त्रज्ञांनी दिली चेतावनीSaam Tv
Published On

जगभरात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता शास्त्रज्ञांनी अनेक इशारे दिले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन हा कोरोनाचे शेवटचा प्रकार असणार नाही. संसर्गाची प्रकरणे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने त्याचे नवीन प्रकारही येण्याचा धोका देखील वाढेल. द टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीचे एपिडेमियोलॉजिस्ट लिओनार्डो मार्टिनेझ यांनी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. लिओनार्डोंच्या मते, संसर्ग वेगाने वाढत आहे. याचा परिणाम Omicron वर होणार आहे.

जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ओमिक्रॉन (Omicron Variant) आपल्यात वेगवेगळे बदल करु शकतो. या बदलानंतर, एक नवीन प्रकार तयार होऊ शकतो आणि जो अधिक धोकादायक असू शकतो. ओमिक्रॉन नोव्हेंबरमध्ये सापडला आणि तो वेगाने पसरला, असे लिओनार्डो सांगतात. संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा चारपट वेगाने संसर्ग पसरवू शकतो.

डेल्टा, ओमिक्रॉनंतर अजून किती कोरोना प्रकार; शास्त्रज्ञांनी दिली चेतावनी
बालकाची भीषण हत्या! अपहरण करुन डोळे काढले,मग अ‍ॅसिडने जाळून टाकले कारण...

परिस्थिती अशीच राहिली तर त्याची नवीन रूपं जन्माला येऊ शकतात. लिओनार्डो म्हणतात, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत अशा लोकांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होत आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. स्टुअर्ट कॅम्पबेल यांनी देखील ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांवर बोलले आहे. डॉ. स्टुअर्ट म्हणतात, जर संसर्गाची प्रकरणे सतत वाढत गेली आणि त्यांचे चक्र दीर्घकाळ चालू राहिले तर नवीन रूपे जन्माला येतील.

डेल्टा आणि ओमिक्रॉनने रुपं बदलली तर परिस्थिती भयानक होईल

ओमिक्रॉनचा पहिला शोध लावणाऱ्या डॉ. अँजेलिक कोएत्झी (Angelique Coetzee) यांनीही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जर डेल्टा आणि ओमिक्रॉनने आपले रुप बदलले तर परिस्थिती भयानक होईल, असे ते म्हणाले. आणखी एक गोष्ट अस्वस्थ करणारी आहे, ती म्हणजे साथीच्या आजारात विषाणू संसर्गा झालेल्या रुग्णांना दिली जाणारी प्रतिजैविके (Antibiotics). अशाप्रकारे, संसर्गादरम्यान Antibiotics चा बेजबाबदार वापर केल्यास जीवाणूजन्य साथीचा रोग होऊ शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

ते म्हणाले, लोकांना ओमिक्रॉनची लागण होत आहे, परंतु ते बरेही होत आहेत. व्हायरसकडे या सकारात्मक भुमिकेने पाहू नये. त्याऐवजी, किती लोकांना आयसीयूमध्ये दाखल केले ते पहा. जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा मृत्यूदर किती आहे ते समजून घ्या. ते म्हणाले, जर तुम्ही लस घेतली नाही किंवा तुम्ही आधीच एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर तुमचा आजार गंभीर होण्याचा धोकाही जास्त आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन सापडला. ओमिक्रॉनमुळे परिस्थिती कशी निर्माण झाली यावर ते म्हणाले, आमच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की ओमिक्रॉनमुळे संसर्ग झालेला प्रत्येक तिसरा रुग्ण गंभीर स्थितीत आहे आणि रुग्णालयात आहे. 17 डिसेंबरपर्यंत दररोज 23 हजार रुग्णांची नोंद होत होती. त्यापैकी 558 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 7900 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com