चायनिज खाद्यपदार्थात घातक अजिनोमोटोचा सर्रासपणे वापर!

लहान मुलांसाठी अजिनोमोटो हानिकारक
चायनिज खाद्यपदार्थात घातक अजिनोमोटोचा सर्रासपणे होतो वापर!
चायनिज खाद्यपदार्थात घातक अजिनोमोटोचा सर्रासपणे होतो वापर!अरुण जोशी
Published On

अमरावती - जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक चायनिज Chinese पदार्थ आवडीने खातात. मात्र, टेस्टींग पावडर म्हणून ओळख असलेला अजिनोमोटो Ajinomoto आरोग्याला हानीकारक असताना चायनिज पदार्थांमध्ये याचा सर्रास वापर करण्यात येतो त्यामुळे अनेकांना नकळत पोटाचे विकार बळावत आहे. तर चायनिज पदार्थ खाण्याची आवड लहान मुलांसह तरुणांना अधिक असते. त्यांच्या पोटात जाणारे चविष्ट चायनिज पदार्थांत अजिनोमोटोचा वापर अतिप्रमाणात होत असल्याने तो शरीरासाठी हानीकारक ठरून त्यांना न कळत पोटाचे विकार होत असल्याचे वास्तव आहे.

हे देखील पहा -

कोरोनाकाळात Corona चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या बंद होत्या.मात्र,आता अनलॉक मध्ये शिथिलता मिळताच शहरातील पंचवटी,बियाणी,राजकमल,गाडगेनगर चौक अशा मुख्य चौकात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागतात. या ठिकाणी नूडल्स, मंचुरियम व इतर खाद्यपदार्थ विक्री होते. ५० पासून तर १५० रुपयापर्यंत या पदार्थांची प्रतिप्लेट विक्री केली जाते. मात्र, पदार्थ चविष्ट होण्याकरिता मिठासारखे दिसणाऱ्या अजिनोमोटोचा टेस्टिंग पावडर म्हणून वापर केला जातो.

अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट सिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. याचा वापर पूर्वी इतर देशात व्हायचा.पण आता भारतातसुद्धा चायनिज पदार्थ व इतर पदार्थांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो.

चायनिज खाद्यपदार्थात घातक अजिनोमोटोचा सर्रासपणे होतो वापर!
उध्दव ठाकरे यांचा उध्द्टपणा सहन करणार नाही; किरीट सोमय्यांचा घणाघात

चायनीज पदार्थ किंवा हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता नॉनव्हेज पदार्थ,अंडाकरी तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो.त्यामुळे नागरिकांना नकळत जेवणातून घातक आजार मोफत मिळत आहेत.अतिप्रमाणात सतत सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कितीतरी पटीने वाढतो तसेच आतड्याचे,पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com