उन्हाळ्यातही सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? हे उपाय करून पाहा...

उन्हाळ्यात या थंडगार गोष्टी तहान शमवतात, तसेच शरीराला थंडावा देतात खऱ्या, पण याच गोष्टी आपल्याला उन्हाळ्यातही सर्दी-खोकला देऊन जातात.
Cough-Cold
Cough-ColdSaam Tv

Summer Cold: सध्या उन्हाचा पारा आणखी वाढत आहे, या ऋतूत उष्णता आणि तहान अधिक लागते. तहान शमवण्यासाठी आपण थंड ज्यूस, थंड शीतपेये आणि फ्रिजमधील बर्फाचे थंड पाणी पितो. तेव्हा कुठे उष्णतेपासून तहान भागते आणि शरीर ताजेतवाने राहते. उन्हाळ्यात या थंडगार गोष्टी तहान शमवतात, तसेच शरीराला थंडावा देतात खऱ्या, पण याच गोष्टी आपल्याला उन्हाळ्यातही सर्दी-खोकला देऊन जातात. (Summer cold remedies in Marathi)

उन्हाळ्याच्या दिवसातही सर्दी-खोकला (Summer cold) कसकाय होऊ शकतो? असे वाटते असं होणं खूप विचित्र आहे. परंतु उन्हाळ्यात सर्दी ही थंड आणि गरम पदार्थाच्या सेवनाने जाणवते. उन्हाळ्यात सर्दी आणि खोकला होण्याचे कारण म्हणजे एन्टरोव्हायरस, जो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो.

उन्हाळ्यात होणाऱ्या या सर्दीमुळे व्यक्तीला शिंका येणे, नाक बंद होणे, खोकला, घसा खवखवणे आणि छातीत कफ जमा होण्याचा त्रास होतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून झटपट आराम मिळवू शकता.

Cough-Cold
तेलाच्या किमती पुन्हा वाढणार! इंडोनेशियाची पाम तेल निर्यातीवर बंदी

-अद्रकाचे सेवन करा:

उन्हाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी अद्रकाचे सेवन करू शकता. अद्रक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि सर्दीवर उपचार करते. आल्याचा चहा, काढा, आणि आल्याचे दूध पिण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. आल्यामध्ये असलेले अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म नाकातील जळजळ कमी करतात आणि छातीत कफ तयार होण्यास प्रतिबंध करतात.

हे देखील पाहा-

-मध आणि लिंबाचे सेवन करा :

जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर मधासोबत लिंबाचे सेवन करा. मधामध्ये अनेक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे सर्दी आणि फ्लूपासून दूर राहण्यास मदत करतात. मध आणि लिंबू एकत्र सेवन करण्यासाठी तुम्ही एक कप पाणी गरम करून त्यात दोन चमचे मध घाला आणि त्यात 3-4 चमचे लिंबाचा रस घालून कोमट प्या, उन्हाळ्यातील सर्दीची लक्षणे दूर होण्यास मदत होईल.

-हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करा:

उन्हाळ्यात थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात थोडी हळद आणि थोडे मीठ मिसळून गुळण्या करा. दिवसातून 2-3 वेळा गुळण्या केल्याने घशात जमा झालेला कफ निघून जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन इन्फेक्शन, ऍलर्जी दूर करते.

-लवंग आणि तुळशीचे सेवन करा:

लवंग बारीक करून मधात मिसळून खाल्ल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दीपासून आराम मिळेल. लवंग आणि तुळशीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com