Reliance Jio launches Jio Bharat phone
Reliance Jio launches Jio Bharat phoneSaam Tv

Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G फोन, किंमत फक्त 999 रुपये; जाणून घ्या अधिक माहिती

Jio Launches Jio Bharat Phone: Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G फोन, किंमत फक्त 999 रुपये; जाणून घ्या अधिक माहिती
Published on

Jio launches Jio Bharat 4G Phone: Reliance Jio ने सर्वात स्वस्त 4G फोन 'Jio Bharat V2' भारतात लॉन्च केला आहे. याची किंमत फक्त 999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीची भारतातील सुमारे 25 कोटी 2G ग्राहकांवर लक्ष्य आहे. हे ग्राहक सध्या Airtel आणि Vodafone-Idea सारख्या कंपन्यांशी संबंधित आहेत. यातच रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. रिलायन्स जिओचा दावा आहे की, 'Jio Bharat V2' च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल.

Reliance Jio launches Jio Bharat phone
Tata Upcoming Electric Car: मुंबई-पुणे-मुंबई एका चार्जमध्ये गाठणार! येत आहे फ्युचरिस्टिक लूकमध्ये टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक कार

Jio Bharat V2 ची किंमत

Jio Bharat V2 ची किंमत इंटरनेटवर काम करणाऱ्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व फोन्समध्ये सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये उपलब्ध 'Jio Bharat V2' चा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागतील. (Latest Marathi News)

यातच इतर ऑपरेटरच्या व्हॉईस कॉल आणि 2 जीबीचा मासिक प्लॅन 179 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय कंपनी 'Jio Bharat V2' च्या ग्राहकांना 14 GB 4G डेटा देईल. म्हणजेच प्रति दिन अर्धा GB, जो स्पर्धकांच्या 2 GB डेटापेक्षा 7 पट जास्त आहे. 'Jio Bharat V2' साठी एक वार्षिक प्लान देखील आहे, ज्यासाठी ग्राहकाला 1234 रुपये द्यावे लागतील.

Reliance Jio launches Jio Bharat phone
Royal Enfield 750cc Bike: जबरदस्त आणि पॉवरफुल! येत आहे रॉयल एनफील्डची पहिली 750cc इंजिन बाईक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेकवेळा सार्वजनिक मंचांवरून 2G मुक्त भारताबद्दल बोलले आहेत. कंपनीने 25 कोटी 2G ग्राहकांना 4G वर आणण्यासाठी 'जिओ भारत' प्लॅटफॉर्म देखील लॉन्च केला आहे. इतर कंपन्या 4G फोन बनवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील. कार्बननेही त्याचा वापर सुरू केला आहे. 2G फीचर फोनची जागा लवकरच 4G भारत सीरीज मोबाईल घेईल अशी तज्ञांची अपेक्षा आहे.

2G ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2018 मध्ये Jio फोन देखील आणला होता. JioPhone आजही 13 कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती आहे. कंपनीला 'Jio Bharat V2' कडूनही त्याच अपेक्षा आहेत. कंपनीने 7 जुलैपासून 'Jio Bharat V2' ची बीटा ट्रायल सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com