Chanakya Niti On Marriage : लग्नापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाते होईल आणखीन मजबूत

Marriage Tips : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती मध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यात त्या रहस्यांचाही समावेश आहे. स्त्री-पुरुष एकमेकांना ओळखत असतील तर ते आयुष्यभर आनंदाने जगू शकतात.
Chanakya Niti On Married Life
Chanakya Niti On Married LifeSaam tv
Published On

Chanakya Niti :

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती मध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यात त्या रहस्यांचाही समावेश आहे. स्त्री-पुरुष एकमेकांना ओळखत असतील तर ते आयुष्यभर आनंदाने जगू शकतात. आचार्य चाणक्य यांची धोरणे जीवनात अंगीकारली तर केवळ वैवाहिक जीवनातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही त्याचा फायदा (Benefits) होईल.

नितीशास्त्रात जीवन जगण्याची अनेक तत्त्वे सांगितली आहेत. ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रीला लग्नापूर्वी काही रहस्ये जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन (Married Life) आनंदी राहून नातेसंबंध अबाधित राहतील.

Chanakya Niti On Married Life
Chanakya Niti On Success | यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्यांचे हे शब्द लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की पती-पत्नीचे नाते यशस्वी व्हावे. यासाठी दोघांमधील वयातील फरक योग्य असणे महत्त्वाचे आहे. होय, आचार्य चाणक्य यांच्या मते, जर हा फरक दूर झाला तर नात्यातील आनंद नाहीसा होतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्री-पुरुष शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहिले पाहिजे. दोघांमधील वयाचा फरक जितका कमी तितका चांगला. अन्यथा समन्वय राहणार नाही आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थतेमुळे संबंध तुटू शकतात.

Chanakya Niti On Married Life
Chanakya Niti On Work Life Balance : नोकरी आणि कुटुंबामध्ये कसा राखाल समतोल? या 3 गोष्टी करा, कधीही येणार नाही ताण

आचार्य चाणक्य म्हणतात की, तरुण स्त्रीचे वयाने मोठ्या पुरुषाशी केलेले लग्न कधीही यशस्वी होऊ शकत नाही. हे न जुळणारे लग्न असेल. कारण लग्नासारखे पवित्र बंधन घट्ट करण्यासाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. जे वयाच्या फरकाने शक्य नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com