SMS Scheduled For birthday
SMS Scheduled For birthdaySaam TV

SMS Scheduled For birthday : भारीच! रात्री १२ वाजता बर्थडे विश करण्याचं टेन्शन मिटलं; जाणून घ्या काय आहे फोनमधलं नवीन फीचर

SMS New Features : तुम्ही रात्री झोपेत असाल तरी देखील संबंधित व्यक्तीला तुमचा मॅसेज पोहचू शकतो. यासाठी तुमच्याकडे एन्ड्रॉइड फोन असायला हवा. हे फीचर फक्त मॅसेंजरसाठी उपलब्ध आहे.

Birthday Wishes :

आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असल्यावर आपण त्यांना रात्री १२ वाजता विश करतो. बरोबर १२ वाजता विश करण्यासाठी अनेक जण रात्रभर जागे राहतात. अशात सकाळी लवकर उठायचे असल्यास अशा वाढदिवसांमुळे झोपपूर्ण होत नाही. तर आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बरोबर रात्री १२ वाजता विश करायचे असेल तर रात्री जागे राहण्याची गरज नाही. कारण फोनमध्ये यासाठीचा एक जुगाड आम्ही शोधलाय.

SMS Scheduled For birthday
Happy Holi 2024 Wishes : सुंदर संदेश, कोट्स आणि व्हॉट्सअ‍ॅपसह फेसबुक स्टेटस; होळीसाठी अशा द्या शुभेच्छा

तुम्ही रात्री झोपेत असाल तरी देखील संबंधित व्यक्तीला तुमचा मॅसेज पोहचू शकतो. यासाठी तुमच्याकडे एन्ड्रॉइड फोन असायला हवा. हे फिचर फक्त मॅसेंजरसाठी उपलब्ध आहे. मॅसेंजरमध्ये अशा पद्धतीने मॅसेज करण्यासाठी मॅसेज शेड्युलचा पर्याय उपलब्ध आहे.

मॅसेज शेड्युल कसा करायचा?

१. सर्वांत आधी तुमच्या फोनमधील मॅसेंजर बॉक्स ओपन करा.

२. त्यानंतर ज्या व्यक्तीला मॅसेज पाठवायचा आहे त्याना नंबर सिलेक्ट करा.

३. त्यावर मॅसेज टाइप करून घ्या. हा मॅसेज लगेचच सेंड करू नका.

४. मॅसेज सेंड करताना की होल्ड करून ठेवा.

५. त्यानंतर तुम्हाला शेड्यूलसाठी ऑप्शन दिसेल.

६. यामध्ये तुम्ही तारीख आणि वेळ दोन्ही गोष्टी सिलेक्ट करून मॅसेज शेड्यूल करू शकता.

अशा पद्धतीने मॅसेज शेड्यूल करून तुम्ही निवांत झोपू शकता. असे केल्याने तुमा वेळ वाचेल, रात्री जागावे लागणार नाही, तसेच तुमच्या प्रिय व्यक्तीला वेळेत तुमचं बर्थडे विश मिळेल.

अनेक जोडप्यांमध्ये रात्री १२ ला बर्थडे विश न केल्याने भांडणे होतात. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड रुसून बसतात. या सर्व गोष्टी मॅसेंजरमधील या ट्रिकने तुम्हाला टाळता येतील.

SMS Scheduled For birthday
Swara Bhaskar Birthday: स्वरा- फहदची नेमकी लव्हस्टोरी कशी होती ?, खुद्द अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com