Biggest Railway Stations In India : भारतातील सर्वात मोठ्या 'या' 5 रेल्वे स्थानकांबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

तुम्हाला माहित आहे का ? आपल्याला देशातील सगळ्यात लांब व मोठी अशी रेल्वे स्थानके कोणती आहेत
Biggest Railway Stations In India
Biggest Railway Stations In IndiaSaam Tv

Biggest Railway Stations In India : भारत हा वैविध्यपूर्णतेने नटलेला देश आहे. इथे जितके सणांना महत्त्व आहे तितकेच तेथील विविध गोष्टींना. या देशात प्रत्येक नोकरी करणारा किंवा कामानिमित्त बाहेर पडणारा व्यक्ती हा रेल्वेने प्रवास करतो परंतु, तुम्हाला माहित आहे का ? आपल्याला देशातील सगळ्यात लांब व मोठी अशी रेल्वे स्थानके कोणती आहेत चला तर जाणून घेऊया त्याबद्दल

असे म्हटले जाते की भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेखा आहे आणि ती प्रत्येक माणसाचा अविभाज्य भाग आहे. भारतात (India) पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून धावली ती 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली.

भारतीय रेल्वे (Train) सुमारे 114,500-किलोमीटर ट्रॅक आणि सुमारे 7,500 स्थानकांसह जगात चौथ्या क्रमांकावर आहे. हे जगातील एकमेव रेल्वे नेटवर्क आहे जे रेल्वे मंत्रालयाद्वारे चालविले जाते. या लेखात, आम्ही भारतातील काही सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांबद्दल सांगणार आहोत.

Biggest Railway Stations In India
Group Travelling : ग्रुप ट्रॅव्हलिंगमुळे नाते होते आणखी घट्ट, अमेरिकेने केला खुलासा

1. हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन

Howrah railway station
Howrah railway stationCanva

हावडा रेल्वे स्थानक, हे कोलकाता महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक हुगळी नदीच्या पश्चिम काठावर हावडा शहरामध्ये स्थित असून हावडा पूल ह्या स्थानकाला कोलकाता शहरासोबत जोडतो. २३ फलाट असलेले हावडा भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ते पूर्व रेल्वे व दक्षिण पूर्व रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे. या स्थानकावरून दररोज किमान 1 दशलक्ष लोक प्रवास करतात.

प्लॅटफॉर्मची संख्या: 23

ट्रॅकची संख्या: 25

2. सियालदह रेल्वे स्टेशन

Sealdah railway station
Sealdah railway stationCanva

सियालदाह रेल्वे स्थानक हे कोलकाता महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक कोलकाता उपनगरी रेल्वे प्रणालीमधील एक टर्मिनस असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या देखील येथून सुटतात. या स्थानकाचे उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग आहेत. दररोज 1.8 दशलक्ष लोक सियालदह रेल्वे स्थानक ओलांडतात. हे स्टेशन सुमारे 158 वर्षांपूर्वी सुरू झाले!

प्लॅटफॉर्मची संख्या: 21

ट्रॅकची संख्या: 27

Biggest Railway Stations In India
Travel Tips : कोणत्याही ट्रिपसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया

3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

chhatrapati shivaji maharaj terminus
chhatrapati shivaji maharaj terminusCanva

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा सीएसटी हे एक ऐतिहासिक स्थानक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद आहे. याला व्हिक्टोरिया टर्मिनस असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेचे टर्मिनल म्हणून ओळखले जाते.

प्लॅटफॉर्मची संख्या: 18

ट्रॅकची संख्या: एकाधिक

4. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन

New Delhi Railway Station
New Delhi Railway StationCanva

नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. १६ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज सुमारे ४०० गाड्या सुटतात ज्यांमधून अंदाजे ५ लाख प्रवासी प्रवास करतात. हे भारतामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रातील दिल्ली विभागाचे मुख्यालय येथेच आहे. ट्रेनच्या वारंवारतेच्या आणि प्रवाशांच्या हालचालींच्या दृष्टीने हे भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त, हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन देखील आहे.

प्लॅटफॉर्मची संख्या: 16

ट्रॅकची संख्या: 18

5. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन

chennai central railway station
chennai central railway stationCanva

चेन्नई सेंट्रल हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे. हे चेन्नई शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन कोलकाता, नवी दिल्ली, मुंबईसह भारताच्या उत्तर भागाशी जोडते. दररोज सुमारे 550,000 लोक स्टेशनचा वापर करतात, ज्यामुळे ते भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

प्लॅटफॉर्मची संख्या: 17 (12 लांब अंतर, 5 उपनगरे)

ट्रॅकची संख्या: 30

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com