Banana leaf Benefits: केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे

हिंदू धर्मातही (Hinduism) केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. या प्रथेमागे धार्मिक कारणासह वैद्यकीय कारणेही आहेत.
Banana leaf  Benefits: केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे
Banana leaf Benefits: केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे Saam Tv News
Published On

दक्षिण भारतात (South India) केळीच्या पानावर (Banana Leaf) जेवण्याची (Eating) प्रथा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. हिंदू धर्मातही (Hinduism) केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. या प्रथेमागे धार्मिक कारण तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट आढळतात. आयुर्वेदानुसार केळीच्या पानात पॉलीफेनॉल्स (Polyphenols) किंवा एपिगॅलोकेटॅचिन गॅलेट (epigallocatechin gallate) किंवा ईजीसीजी म्हटलं जाणारे हे घटक आढळतात.

हे देखील पहा-

पर्यावरण पुरक आणि आरोग्याला फायदेशीर

केळीच्या पानावर एक अतिक्ष्म मेणासारखा पापुद्रा असतो. केळीच्या पानावर गरम गरम जेवण वाढल्यानंतर त्यावरील हा पापुद्रा वितळतो आणि जेवणाला चांगली चव येते. बऱ्याचदा लोक डिस्पोजेबल प्लेटची गरज असताना प्लॅस्टिक किंवा स्टायरोफोमटच्या प्लेट वापरतात. मात्र, त्या तुलनेत केळीची पाने पर्यावरण पूरक जलद विघटनशील असतात. केळीच्या पानावर जेवल्याने शरीर आणि मनाची सात्विकता वाढते.

Banana leaf  Benefits: केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे
वहिनींवर ऍसिड फेकायला काेणी सांगितले? या टीकेवर सामंत म्हणाले...

त्वचारोग, अपचन, गॅस सारख्या त्रासावर आरोग्यदायी

केळीच्या पानावर दररोज जेवल्याने आरोग्य चांगलं राहतं. त्वचारोग, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस सारखे त्रास होत नाहीत. केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट पोटामध्ये जातात. केळीच्या पानावर जेवल्याने मेंदूचा रक्तप्रवाह सुरळीतपणे चालू राहतो. इतकेच नव्हे तर, त्वचेवरील पुरळ, डाग आणि मुरुम असल्यास केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो.

फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजारावर गुणकारी

केळीचे पान सुकवून त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाका, असे केल्यास फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात. केळीचं पान खाणं शक्य नसलं तरी त्यावर गरम जेवण जेवल्याने पानातील पौष्टिक घटक पोटात जातात. त्यामुळे आजारी पडण्याच्या शक्यताही कमी होते.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com