दिसायला इवलासा पण आरोग्यासाठी फायदेशीर असा कढीपत्ता !

कढीपत्त्याचे आहारात सेवन केल्यास आरोग्याला कसा फायदा होईल हे जाणून घ्या.
Healthy Benefits Of Curry leaves, Curry leaves Benefits in Marathi, curry leaves medicinal uses
Healthy Benefits Of Curry leaves, Curry leaves Benefits in Marathi, curry leaves medicinal usesब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : कढीपत्ता हा मसाल्यातील पदार्थ असून जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे फोडणीला विशेष चव प्राप्त होते. कढी, चटणीसाठी प्रामुख्याने वापर केला जातो. (Curry leaves Benefits in Marathi)

हे देखील पहा -

जेवणात त्याचा वापर केल्याने चव तर वाढतेच परंतु, कढीपत्ता आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे. कढीपत्त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, झिंक, मल्टीविटामिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या पोषक तत्व आढळून येतात. जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. तसेच आयुर्वेदानुसार कढीपत्त्याचा उपयोग अँनिमिया, मधुमेह, अपचन, लठ्ठपणा, किडनी समस्या, केस आणि त्वचेच्या समस्या (Problems) दूर करण्यासाठी देखील केला जातो. (Healthy Benefits Of Curry leaves)

कढीपत्त्याचे आरोग्यासाठी फायदे (Benefits)

१. कढीपत्त्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच यांच्या सेवनाने चक्कर येणे, उलट्या होणे आणि जुलाब होणे इत्यादी तक्रारी कमी होतात.

Healthy Benefits Of Curry leaves, Curry leaves Benefits in Marathi, curry leaves medicinal uses
Health Tips : अंड्यातील पिवळा भागाविषयी समज - गैरसमज

२. कढीपत्त्यात भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे शरीरातील स्नायूंची वाढ होण्यास मदत होईल. तसेच याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात.

३. कढीपत्त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचा आहारात समावेश केल्याने हाडांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते आणि दात मजबूत राहतात.

४. कढीपत्त्याच्या मदतीने विविध प्रकारचे आवश्यक तेले तयार केले जातात, ज्यामुळे केस, त्वचा आणि तोंडाच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच, कढीपत्त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते

५. आपल्याला अँनिमियाचा त्रास होत असेल तर, आपल्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करा. याची काही पाने रोज खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढू शकते, ज्यामुळे रक्ताची (Blood) कमतरता दूर होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com