बार्ली आणि द्राक्षे कुजून बिअर तयार केली जाते. सामान्यतः लोक हे आरोग्यासाठी हानिकारक मानतात. परंतु संशोधनानुसार जर बिअर (Beer) मर्यादित प्रमाणात घेतली गेली तर तिचे अनेक आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात. पण आवश्यकतेपेक्षा जास्त घेतल्यास तिचे नुकसानही होते.
हे देखील पहा-
बीयर पिण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे
- तणाव (Stress) दूर करते: दारू आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. परंतु बिअरबद्दलच्या आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, जर बिअर मर्यादित प्रमाणात घेतली गेली तर त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. आजकाल लोकांमध्ये तणाव, अस्वस्थता आणि थकवा खूप सामान्य झाला आहे. मात्र, बिअर तणाव, चिंता आणि थकवा दूर करू शकते, असे काही संशोधनातून आढळून आले आहे. पण ते 350 मिलिग्रॅम पेक्षा जास्त वापरू नये.
- किडनी स्टोन (Kidney Stone)मध्ये फायदेशीर : किडनी स्टोन म्हणजे मुतखडा झाला असेल तर, बीयरच्या सेवनाने तो मोडून बाहेर पडतो असे काहींचे म्हणणे आहे. म्हणूनच अनेक लोक किडनी स्टोनच्या वेळी बिअर पिण्याची शिफरस करतात. मात्र याबद्दल एकदा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- त्वचेसाठी (Skin) चांगले : त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी किती हजारो रुपये खर्च करतात, पण फक्त बिअर प्यायल्याने तुमच्या त्वचेवर खूप परिणाम होतो. खरं तर, बिअरमध्ये हॉप्स आणि यीस्ट असते, जे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर शरीरावरील जखमा जलद भरते.
- अल्झायमरमध्ये (Alzheimer) फायदेशीर: अल्झायमरच्या समस्येमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते आणि कालांतराने तो गोष्टी विसरू लागतो. मात्र मर्यादित प्रमाणात बिअर प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते. बिअरमध्ये सिलिकॉन आणि हॉप्स सारखे घटक अल्झायमर रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात.
- अल्सरमध्ये (Ulcers)आराम देते: संशोधनानुसार 75 मि.ग्रा. बिअर घेतल्याने अल्सरच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो आणि त्यामुळे एच.पायलोरी संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. पण बियर फक्त मर्यादित प्रमाणात घ्या कारण त्याचे बरेच तोटे आहेत.
(टिप: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. वरील प्रयोग करण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Edited By - Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.