Tea Bag Benefits : चहा हे सगळ्यांचे आवडते पेय. आपल्यापैकी अनेकांना चहा (Tea) प्यायला आवडतो. आजकाल बाजारात चहाचे अनेक प्रकार प्यायला मिळतात. वजन कमी करण्यासाठी हल्ली बरेच जण चहा बनवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या ग्रीन टी (Green Tea) बॅगचा वापर करतात. चहा बनवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग जरी असला तरी, ग्रीन टी बॅगच्या पिशव्या वापरल्यानंतर आपण त्या निरुपयोगी म्हणून फेकून देतो. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात? आपली त्वचा (Skin) आणि केसांचे (Hair) आरोग्य सुधारण्यासाठी आपण त्याचा वापर करु शकतो. (Before throwing away a used tea bag learn its benefits)
हे देखील पाहा -
ग्रीन टी बॅगचा वापर कसा करावा यासाठी काही टिप्स
१. तोंडाला छाले पडणे -
काहींच्या तोंडात अल्सरची समस्या अनेकदा होते. अशावेळी आपण चहा बनवताना वापरण्यात येणाऱ्या ग्रीन टी बॅगमुळे तोंडाला येणाऱ्या छालांपासून सुटका मिळू शकते. वापरलेली ग्रीन टी पिशवी थंड झाल्यानंतर तोंडाच्या व्रणावर ५ ते १० मिनिटे ठेवा, असे केल्याने चहाच्या पिशवीत असलेले घटक तोंडाच्या छालांपासून मुक्त होण्यास मदत होईल.
२. मुरुमांसाठी उपयुक्त -
वापरलेल्या ग्रीन टी बॅगमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या ग्रीन टी बॅग्ज बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. वापरलेली ग्रीन टी बॅग थंड करून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळते.
३. केसांची चमक वाढवा -
त्वचेसाठी फायदेशीर असलेली ग्रीन टी केसांसाठीही अधिक फायदेशीर ठरते. केसांना त्याचा वापरण्यासाठी पाण्यात १५ मिनिटे ग्रीन टी बॅग्ज उकळा आणि रात्रभर त्याच पाण्यात त्यांना राहू द्या. दुसऱ्या दिवशी या टी बॅगचे पाणी ओल्या केसांवर टाकून १० मिनिटानंतर केस चांगले धुवा. ह्या ग्रीन टी बॅग्ज केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून काम करतील.
४. डोळे सुंदर बनवा -
आपल्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा पुनर्वापर आपण करू शकतो. यासाठी ग्रीन टी बॅग काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर त्या डोळ्यांवर ठेवा. ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
५. चेहऱ्याच्या त्वचेला आणा ताजेपणा -
वापरलेली ग्रीन टी बॅगमधून ग्रीन टी काढून घ्या. यानंतर त्यात समान प्रमाणात मध आणि बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. फेस पॅक तयार होईल. हा फेस पॅक आपण आठवड्यातून एकदा वापरू शकतो. ग्रीन टी आपल्या चेहऱ्याची त्वचा घट्ट करते आणि बेकिंग सोडा चेहऱ्यावरील धूळ आणि घाण साफ करण्यासाठी मदत करते.
अशाप्रकारे आपण वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा उपयोग करु शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.