Bajaj CNG Bike : पेट्रोलवर भारी पडणार CNG! बाजारात बजाजचा धमाका, फ्यूलचा खर्च होईल अर्धा

CNG Bike Launch : बजाज ऑटो सीएनजीवर चालणारी एन्ट्री-लेव्हल मोटरसायकल लॉन्च करू शकते.
Bajaj CNG Bike
Bajaj CNG BikeSaam Tv
Published On

Bajaj Launch CNG Bike :

आतापर्यंत तुम्ही फक्त पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बाइक्स पाहिल्या असतील, पण बजाज ऑटो लवकरच एंट्री-लेव्हल टू व्हीलर सेगमेंटमध्ये मोठा स्प्लॅश बनवण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला लवकरच सीएनजी बाइक्स पाहायला मिळतील, बजाज कंपनीला विश्वास आहे की सीएनजी मोटारसायकली बाजारात आल्याने लोकांचा इंधनाचा खर्च निम्म्यापेक्षा कमी होईल.

बजाज ऑटो सीएनजीवर चालणारी एन्ट्री-लेव्हल मोटरसायकल लॉन्च (Launch) करू शकते. कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, सीएनजी मोटारसायकल खरेदी आणि फ्यूल या दोन्ही बाबतीत स्वस्त होतील. हे अशा खरेदीदारांना आकर्षित करू शकते ज्यांना पेट्रोलचे उच्च दर परवडत नाहीत.

Bajaj CNG Bike
New Honda Bike ची Bajaj Pulsarला टक्कर! किंमत कमी अन् मायलेज जास्त; बाईकची पहिली झलक पाहाच

सीएनजी बाईक लाँच होणार का?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर 100 रुपयांच्या खाली गेलेले नाहीत. अशा स्थितीत नवीन कार आणि बाईक घेणारे आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत.

लोकांचा हा बदलता ट्रेंड पाहून ऑटो (Auto) कंपन्याही त्यांच्या उत्पादनांमध्ये बदल करत आहेत. आता देशातील एक प्रसिद्ध कंपनी सीएनजीवर चालणारी बाईक बाजारात आणण्याच्या विचारात आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक इंधनाचा वापर अर्ध्या किंमतीत करेल, असा दावा केला जात आहे.

सणासुदीच्या काळात 100cc सेगमेंटमधील एंट्री-लेव्हल बाइकच्या विक्रीत त्यांना कोणतीही वाढ दिसत नाही कारण ग्राहक इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळत आहेत. तुमच्या माहितीसाठी बजाज ऑटोकडे 100 सीसी आणि 125 सीसी सेगमेंटमध्ये एकूण 7 मोटारसायकली आहेत.

Bajaj CNG Bike
Bajaj E-Scooter Launch : दमदार फीचर्ससह Bajaj आणणार नवी ई-स्कूटर! Ola, Ather आणि Simple Oneला देईल टक्कर; वाचा सविस्तर

50 टक्के इंधन बचत

बजाजने सांगितले की, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे चिंतित असलेल्यांसाठी सीएनजी मोटारसायकल हा एक चांगला पर्याय असू शकतो. या बाइक्स खरेदी आणि मायलेज या दोन्ही बाबतीत स्वस्त असतील.

या बाइक्स लाँच झाल्यानंतर इंधनाच्या किमती 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. बजाजने या योजनेवर काम केल्यास सीएनजी बाइक्स बनवणारी भारतातील पहिली कंपनी असेल, असे संकेत त्यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com