Petrol Pump Scam : वाहनधारकांनो लक्ष द्या! पेट्रोल भरण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची गोष्ट आधी तपासा, अन्यथा...

Petrol Pump : पेट्रोल पंपावर त्यांची फसवणूक झाली किंवा त्यांच्या गाडीत कमी इंधन भरले गेले.
Petrol Pump Scam
Petrol Pump ScamSaam Tv
Published On

Fuel Pump Scam : असे बर्‍याच लोकांकडून ऐकायला मिळते की, कुठल्यातरी पेट्रोल पंपावर त्यांची फसवणूक झाली किंवा त्यांच्या गाडीत कमी इंधन भरले गेले. सध्या देशातील अनेक पेट्रोल पंपांवर ही तक्रार सामान्य झाली आहे. तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेलच. भविष्यात अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

ही फसवणूक (Fraud) पेट्रोल (Petrol) पंपावरील कर्मचारी आपल्या मुलासोबत मिळून करतो, असा आरोपही अनेक वाहनधारक करतात. तुम्हीही कधीनाकधी तुमच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेला असाल, तेव्हा आपल्या गाडीत आपण जिकते पैसे मोजले त्यापेक्षा काही तेल भरले गेले आहे, असे वाटले असेल. भविष्यात अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. याच गोठींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Petrol Pump Scam
Petrol Pump : पेट्रोल पंप आज बंद राहणार नाहीत, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये | SAAM TV

याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची घनता तपासा -

पेट्रोल आणि डिझेलची घनता त्याच्या शुद्धतेशी संबंधित आहे. तुम्ही हे सहज तपासू शकता. इंधनाची घनता तपासण्यासाठी सरकारने काही मानके निश्चित केली आहेत, त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारमध्ये भरले जाणारे पेट्रोल-डिझेल किती शुद्ध आहे हे सहज तपासू शकता. इंधनात (Fuel) भेसळ होऊ नये म्हणून मशीनच्या डिस्प्लेवर आणि पेट्रोलच्या पावतीवर पेट्रोल लिहिलेले असते. जर तुम्हाला हे समजत नसेल, तर तुम्ही घनता जारने देखील तपासू शकता.

इंधनाच्या घनतेचे मानक काय आहे?

पेट्रोल आणि डिझेलची घनता सरकारने निश्चित केली आहे, ज्यामध्ये पेट्रोलची घनता 730 ते 800 किलो प्रति घनमीटर आहे. तर, डिझेलच्या शुद्धतेची घनता 830 ते 900 Kg/M3 पर्यंत असते. त्याची श्रेणी निश्चित नाही, ते तापमानातील बदलामुळे होते.

Petrol Pump Scam
Instagram Hacking Scam : तुमची एक चूक अन् इंस्टाग्राम हॅक ! कसे प्रोटेक्ट कराल तुमच्या अकाउंटला, जाणून घ्या प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप

जर तुमच्या कारमध्ये विहित मर्यादेपेक्षा कमी घनतेचे पेट्रोल टाकले जात असेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता.ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक वापरकर्त्याला पेट्रोलची शुद्धता तपासण्याचा अधिकार आहे.

या टिप्स ठेवा लक्षात

1. इंधन भरण्यापूर्वी मीटर झिरोवर असेल याची खात्री करा.

2. इंधन भरताना इंधन नोजल ऑटो कट करण्यासाठी सेट करा.

3. इंधन भरताना नेहमी मीटरवर लक्ष ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com