Face Care : चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सने आहात त्रस्त? तर हे घरगुती फेस पॅक वापरून पाहा

Face Care Tips : प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या सवयी, त्यासोबतच त्वचेची विशेष काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या निर्माण होते.
Face Care
Face CareSaam Tv

Beauty Tips : प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या सवयी, त्यासोबतच त्वचेची विशेष काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या निर्माण होते. त्यामुळे लोक ब्युटी पार्लरमध्ये जाऊन क्लीन अप, ब्लीच, फेशियल करून चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र तुम्ही घरच्या घरी सुद्धा समस्यांपासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी जाणून घ्या फेस पॅक कसे तयार करतात.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी -

ओटमिल दही -

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एक चमचा ओटमिल घ्या. आता त्यात 2 चमचे दही घाला आणि चांगले मिक्स करा. हा तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर चेहऱ्यावर गरम पाण्याने (Water) स्टीम घ्या. नंतर चेहरा पुसून चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

Face Care
Face Care Tips : त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' ओवरनाइट फेसपॅकचा वापर करा

चारकोल-बेंटोनाइट क्ले -

ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी 2 कॅपसुल्स एक्टिव्हेटेड चारकोल घ्या आणि त्यात बेंटोनाइट क्ले, १ चमचा पाणी मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावून चेहऱ्यावर १० मिनिटे मालिश करा. त्यानंतर थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा.

टोमॅटो पल्प -

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी टोमॅटोचा (Tomato) वापर तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टोमॅटोचा पल्प काढून त्यात चिमूटभर हळद घाला. आता या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हातांनी मालिश करा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोरडे होईल. पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने चेहरा धुवा.

Face Care
Face Care Tips : पार्टनरसोबत फिरायला जाण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी!

चेहऱ्यावरील व्हाइटहेड्सने दूर करण्यासाठी -

मुलतानी माती-बदाम पावडर-ग्लिसरीन -

चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही एक चमचा मुलतानी माती घ्या. आता त्यात एक चमचा बदाम पावडर , एक चमचा ग्लिसरीन घाला. त्यानंतर याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर हलक्या हातांनी पाच मिनिटे स्क्रब करा आणि दहा मिनिटे असेच सोडा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

टी ट्री ऑईल -

चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी टी ट्री ऑईलचाही वापर तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ या तेलाचे चार ते पाच थेंब चेहऱ्याच्या ज्या भागात व्हाईटहेड्स असतील तिथे लावायचे आहेत. तेल लावल्यानंर चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करायची आहे. २५ मिनिट तेल तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.

संत्र्याच्या सालीची पावडर / तांदळाचे पीठ -

दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. आता त्यात २ चमचे मटार पावडर घाला आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावून दहा मिनिटे मालिश करून चेहरा पाण्याने धुवा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com