Moody During Period : मासिक पाळीदरम्यान तुमचा मुड खराब होतोय? तर 5 हेल्दी सवयी खास तुमच्यासाठी

Menstruation Mood : मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांचा मूड वेळोवेळी बदलत असतो.
Moody During Period
Moody During PeriodSaam TV

Why Mood Up-Down In Menstrual Problem : मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांचा मूड वेळोवेळी बदलत असतो. मूडस्विंग झाल्याने त्यांची तब्येत खराब होऊ शकते आणि मासिक पाळीच्या लक्षणांमध्ये बिघाड जाणवू लागू शकतो. मूडस्विंग म्हणजे तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल नसणे.

मुडस्विंग झाल्याने महिलांना (Women) वेळोवेळी राग येईल, सोबतच त्या ओरडू देखील शकतात. मूडस्विंग झाल्याने वारंवार रडू येते. अनेक महिलांसोबत ही गोष्ट जास्त प्रमाणात होते कारण की त्या मासिक पाळीच्या हार्मोनल चेंजेस मधून जात असतात.

Moody During Period
Menstruation Pain : पीरियड्सच्या दरम्यान तुमचीही चिडचिड होतेय? तर 'या' 5 टिप्स फॉलो करा

मासिक पाळीच्या (Menstruation) मूडस्विंगपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही हेल्दी सवयी अंगी लावून घ्या. जेणेकरून तुम्हाला मासिक पाळीच्या त्या तीन दिवसांमध्ये जास्त समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

मासिक पाळीमध्ये स्वच्छता ठेवाल तर, मुड बिघडणार नाही -

मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही असा विचार करत असाल की, मेंटल हेल्थचा आणि स्वच्छतेचा काय संबंध आहे. परंतु अनेक स्टडीजमध्ये गोष्टीबद्दल सांगितले आहे. आपल्या आसपास किंवा शरीराची साफसफाई नसल्याने आपली चिडचिड होते आणि आपला मूड खराब होतो.

Moody During Period
Menstruation Care Tips : मासिक पाळी दरम्यान अशा पद्धतीची अंडरवेअर वापरा, हायजीनसोबत अतिशय कम्फर्टेबल

फायबर रीच फुडचं सेवन करा -

डाएटमध्ये फायबर रीच फुडच सेवन केल्याने तुमचा मुड चांगला राहतो. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या मुडस्विंग या समस्येला दुर करण्यासाठी तुम्ही एक प्लेट सलाडचे सेवन करा. संध्याकाळी किंवा लंचच्या आधी एक दोन फळांचे सेवन करा. सिजनल फ्रुट्स खाणे त्यासाठी अत्यंत फायदेशीर असं केल्याने तुमचा मुड चांगला राहील आणि मासिक पाळीदरम्यान तुम्ही आजारी नाही पडणार.

व्यायाम सोडू नका -

मासिक पाळीदरम्यान अनेक महिला व्यायामासाठी ब्रेक घेतात. उलट तुम्ही मासिक पाळीच्या दिवसांमध्ये दररोज व्यायाम केला पाहिजे. इंटेस कसरतीशिवाय तुम्ही फक्तं वॉक देखील करू शकता.

मॅग्नेशियमला डाएटमध्ये शामील करा -

मासिक पाळीदरम्यान मुडस्विंगच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मॅग्नेशियम रीच पदार्थाचे सेवन केले पाहिजे.

पोजिशन बदलत रहा -

मासिक पाळीदरम्यान मुडस्विंगच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या पोजिशन बदलत रहा. एका गोष्टवर जास्त वेळ राहिल्याने तुमचे डोके त्याच गोष्टीकडे केंद्रीत होते. परंतु पोजिशन बदलत राहिल्याने मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास देखील कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com