Mahashivratri 2023 : परदेशात आहात? मग भेट द्या 'या' शिवमंदिरांना

Mahashivratri Special : आज 18 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे.
Mahashivratri 2023
Mahashivratri 2023Saam Tv

Mahashivratri Temples Outside Of India : आज 18 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते.

भगवान महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह करून तपश्चर्या सोडून ग्रहस्थ जीवनात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा (Celebrate) केला जातो. देशभरात सर्व शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी जल्लोष असतो विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात (Temple) भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

आपल्या देशात एकापेक्षा एक सुंदर शिवमंदिर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का परदेशातही शिवमंदिर स्थित आहे आणि तेथील शिवमंदिर आकर्षणाचे केंद्र बनले आहे. चला तर मग जाणून घेऊया परदेशातील शिवमंदिरांविषयी.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : शिवलिंग कोसळून पुन्हा नव्याने येते एकत्र, अशा 'या' आश्चर्यकारक शिवलिंगाबद्दल जाणून घ्या

श्रीलंकेतील प्राचीन शिवमंदिर -

मुन्नेश्वरम नावाचे शिव मंदिर श्रीलंकेत लोकप्रिय आहे श्रीलंकेतील मुख्य मंदिरांमध्ये या शिवमंदिरचा समावेश करण्यात आला आहे. असे म्हणतात की, या मंदिराचा संबंध रामायण काळाशी आहे. रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी या मंदिरात भगवान महादेवाची पूजा केली होती तेव्हापासून हे शिवमंदिर श्रीलंकेत स्थित आहे असे म्हटले जाते.

पशुपतिनाथ नेपाळमधील मंदिर -

पशुपतिनाथ हे शिवमंदिर नेपाळमध्ये स्थित आहे. या शिवमंदिराला शिवभक्तांच्या श्रध्देचे केंद्र म्हटले जाते. हे मंदिर नेपाळ येथील बागमती नदीच्या दोन्ही तीरावर पसरलेले आहे. पशुपतिनाथ मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. हे शिवमंदिर खास असण्याचे कारण हे बारा ज्योतिर्लिंगांनी बनलेले आहे.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : 'हे' आहे जगातील सगळ्यात उंच असे शिवमंदिर, जाणून घ्या

मुक्ती गुप्तेश्वर मंदिर (ऑस्ट्रेलिया ) -

ऑस्ट्रेलियात स्थित मुक्ती गुप्तेश्वर मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या शहरात मुक्ती गुप्तेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लोकांनमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.

प्रंबनन मंदिर ( इंडोनेशिया ) -

इंडोनेशियातील जावा शहरात प्रंबनन मंदिर स्थित आहे. हे शिवमंदिर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांना समर्पित आहे. इंडोनेशियातील हे शिवमंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. महाशिवरात्रीनिमित्त या शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्त गर्दी करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com