Amazon Prime Day Sale 2023 : OnePlus च्या 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर! अल्ट्रा वाइड कॅमेरासह फास्ट चार्जिंग, किमतही खिशाला परवडेल इतकी...

OnePlus Bumper Offer : प्राइम डे सेल रात्री पासून सुरू झाले आहे. या सेलमध्ये Oneplus च्या तिन स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर मिळेल.
Amazon Prime Day Sale 2023
Amazon Prime Day Sale 2023Saam Tv
Published On

Amazon Prime Day : प्राइम डे सेल रात्री पासून सुरू झाले आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस, वेअरेबल्बसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर चांगल्या ऑफर्स उपलब्ध आहेत. फेस्टिव्ह सीझन सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या या सेलमध्ये कंपनी नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सवर तसेच मागील वर्षी आलेल्या OnePlus च्या डिव्हाइसेसवर ऑफर देणार आहे. कंपनीने स्मार्टफोन्सवर भरपूर डिल्स दिल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी कंपनी OnePlus फोनवर बँक ऑफर, कूपन सवलत, हजारो रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय यासारखे फायदे देते.

OnePlus 10R 5G

हा OnePlus फोन दोन स्टोरेज (Storage) पर्यायांमध्ये येतो – 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB. त्याची सुरुवातीची किंमत 32,999 रुपये आहे आणि ती फॉरेस्ट ग्रीन, प्राइम ब्लू आणि सिएरा ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 x 1080 पिक्सेलला सपोर्ट करतो.

Amazon Prime Day Sale 2023
OnePlus New Series Launch: OnePlus 12 आणि Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन लीक, 2K OLED डिस्प्लेसह होणार लॉन्च

या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर ( Processor) देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य आणि 2MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध असेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचर आहे.

OnePlus 11R 5G

हा OnePlus फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो – 8GB RAM + 128GB आणि 16GB RAM + 256GB. त्याची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. फोनमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2772 x 1240 पिक्सेलला सपोर्ट करतो.

Amazon Prime Day Sale 2023
Amazon Prime Day Monsoon Sale: खुशखबर! 'अ‍ॅमेझॉन प्राइम सेल'मध्ये या 5 गोष्टींवर मिळतोय तगडा डिस्काउंट, खरेदीदारांची चांदी...

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा (Camera) सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य आणि 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा उपलब्ध असेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचर आहे.

OnePlus 11 5G

हा OnePlus फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये देखील येतो - 8GB RAM + 128GB आणि 16GB RAM + 256GB. त्याची सुरुवातीची किंमत 56,999 रुपये आहे. फोनमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3216 x 1440 पिक्सेलला सपोर्ट करतो.

Amazon Prime Day Sale 2023
OnePlus 11 5G Update Features : OnePlus 11 5G वापरकर्त्यांसाठी आले नवीन अपडेट! OxygenOS 13.1 मध्ये नवीन फीचर

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य, 48MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 32MP टेलिफोटो कॅमेरा उपलब्ध असेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com