ChatGPT Update
ChatGPT UpdateSaam Tv

ChatGPT Update : AI ची सुविधा मोबाईल युजर्सना सुद्धा! ChatGPT कडून ऑफिशियल मोबाईल अॅप लॉन्च

ChatGPT News Update : लवकरच Android वापरकर्त्यांसाठी ChatGPT अॅप देखील लॉन्च करणार आहे.

ChatGPT For Android : आत्तापर्यंत तुम्ही फक्त वेबवर ChatGPT ऍक्सेस करू शकत होतात. अनेक यूजर्सकडून स्मार्टफोनवर चॅट जीपीटी अॅप हवं अशी मागणी होती. OpenAI ने ही मागणी पूर्ण केली आहे.

OpenAI ने गुरुवारी US मधील iPhone वापरकर्त्यांसाठी ChatGPT अॅप लाँच केले. हे अॅप सध्या फक्त अॅपलच्या अॅप स्टोअरवर आणि USमध्ये उपलब्ध आहे, कंपनी (Company) लवकरच Android वापरकर्त्यांसाठी ChatGPT अॅप देखील लॉन्च करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की अॅप अॅपलच्या ऑफिशियल अॅप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते आणि वापरकर्ते त्यांचा चॅट (Chat) इतिहास सर्व डिव्हाइसेसवर सिंक करू शकतात.

ChatGPT Update
ChatGPT Subscription : भारतात सुरु झाले ChatGPT Plus चे सबस्क्रिप्शन, दरमहा मोजवे लागणार इतके पैसे!

iOS डिव्हाइसेससाठी चॅटजिपीटी अॅप जारी केले -

आहे कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, अॅप पहिल्यांदा यूएसमध्ये आणले जाईल. येत्या काही आठवड्यांत ते इतर देशांमध्ये सादर केले जाईल. कंपनीने सांगितले की, आगामी काळात चॅट पीपीटी अॅप अँड्रॉइड उपकरणांसाठीही उपलब्ध करून दिले जाईल.

हे वापरकर्ते डाउनलोड करण्यास सक्षम असतील -

अॅप स्टोअरवर देखील सूचीबद्ध केले गेले आहे. सूचीनुसार, चॅटजिपीटी अॅप डाउनलोड करण्यासाठी iOS 16.1 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक असेल.

त्याच वेळी, वापरकर्त्यांना अॅप वापरण्यासाठी $ 19.99 (सुमारे 1,700 रुपये) ची पर्यायी सुविधा (Facilities) देखील मिळत आहे. सध्या कंपनीने भारतात आणि इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण ते लवकरच सादर केले जाऊ शकते.

ChatGPT Update
ChatGPT : अरेच्चा! आता ChatGPT 4 सुध्दा माणसांप्रमाणे करणार काम, जाणून घ्या

याप्रमाणे वापरता येऊ शकते -

मात्र यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज किंवा सफारीसारख्या ब्राउझरची मदत घ्यावी लागेल. आता, आयफोन वापरकर्त्यांसाठी एक अॅप लाँच करण्यात आले आहे. एकदा अॅप रोलआउट झाल्यानंतर, Android वापरकर्ते Google Play Store वरून ते डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com