बाहेरील परिस्थिती कशीही असली तरी आपल्या निर्धारात, नियमात आणि आचरणात अखंडता आणण्यासाठी दृष्टिकोन आणि स्थिरता या दोन पैलूंचं महत्त्व आपण भाग एकात समजून घेतलं. आता दुसऱ्या भागात स्वाध्याय आणि कृती या दोन पैलूंचं महत्त्व समजून घेऊयात..A ray of hope in uncertainty - Part 2
हे देखील पहा -
स्वाध्याय -
शाळा, कॉलेज, नोकरी किंवा व्यवसाय यांच्या गरजेपुरतं वाचन किंवा अभ्यास आपण करतो. तुम्ही जर नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर ते तुमचं प्रोफेशन आहे, संपूर्ण अस्तित्व नाही. कामापलीकडील विषयांचा अभ्यास, स्वाध्याय, चिंतन, मनन यासाठी दिवसातील काही काळ बाजूला काढा. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या अस्तित्वाला सखोलता देतो. अपूर्णतेची भावना कमी करतो. आयुष्यात रोल मॉडेल असणं फार महत्त्वाचं आहे. राष्ट्रपुरुष, आध्यात्मिक व्यक्तिमत्व किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील आयकॉन्स यांनी आयुष्याच्या कोंडीतसुद्धा मार्ग शोधून किती उत्तुंग कार्य केलं याने प्रेरणा मिळते, जी आपल्या कठीण काळात आपल्याला साथ देते.
कृती -
आजकाल सगळ्यांना सगळंच माहीत असतं. इंटरनेटमुळे थिअरी ठाऊक असते, विचारही चालू असतात पण कृती होत नाही. माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे कृतीचा. जोपर्यंत रोज नियमित पाळलेली दिनचर्या आणि योगाचा सराव होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. गुलाबजामची रेसिपी वाचून किंवा व्हिडिओ बघून त्याच्या चाखण्याचा अनुभव येणार नाही. तसंच आता कृती करा आणि अनुभव घ्या!
वरील सर्व मार्गांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मशागत आपण करत गेल्यास, सध्या सगळीकडून जरी अंधारून आल्यासारखं वाटलं, तरी एखादा प्रकाशाचा किरण आपल्याला निश्चितच मार्ग दाखवू शकेल.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.