Coconut Oil For Wrinkles : सुरकुत्या घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा या 3 प्रकारे करा वापर

Coconut Oil : वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसणे खूप सामान्य आहे.
Coconut Oil For Wrinkles
Coconut Oil For WrinklesSaam Tv

Wrinkles In Early Age : वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसणे खूप सामान्य आहे, परंतु आजकाल वयाच्या आधीच लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. अकाली सुरकुत्या येण्याचे एक कारण म्हणजे जीवनशैलीतील गडबड, चांगला आहार आणि त्वचेची काळजी न घेणे.

पण एक गोष्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सुरकुत्याच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता आणि ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलामुळे त्वचेतील (Skin) आर्द्रता वाढते. यामुळे त्वचेचे नुकसान टाळता येते. तसेच बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. हे तेल कसे वापरायचे ते जाणून घेऊया.

Coconut Oil For Wrinkles
Face Wrinkles : सुरकुत्यांना वेळीच थांबवायचे आहे ? तर 'या' घरगुती फेस पॅक चा वापर करा

खोबरेल तेल सुरकुत्या कमी करण्यासाठी कसे फायदेशीर आहे?

नारळ तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देते, ज्यामुळे कोलेजन उत्पादन सुधारण्यास मदत होते. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून नवीन त्वचेच्या पेशींना प्रोत्साहन देते. याच्या नियमित वापराने त्वचा घट्ट होते. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते .

सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल कसे वापरावे?

लिंबासह नारळ तेल

खोबरेल तेलाचे काही थेंब घ्या आणि त्यात लिंबाचे काही थेंब घाला . आता हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्यात सुती कापड (Cloths) भिजवून चेहऱ्यावर ठेवा. त्यामुळे तेल त्वचेत चांगले शोषले जाते. रात्रभर सोडा. सकाळी फेसवॉश करा.

Coconut Oil For Wrinkles
Under Eye Wrinkles Remedies : वाढत्या वयात डोळ्यांखाली सुरकुत्या का येतात ? या घरगुती उपायांनी मिळवा सुटका

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि नारळ तेल

सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी 1 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या, त्यात 1 चमचे पाणी आणि व्हर्जिन नारळ तेल घाला. यानंतर चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर राहू द्या. रोजच्या वापराने सुरकुत्या कमी होऊ लागतात .

एरंडेल तेल आणि खोबरेल तेल

एरंडेल तेल (Oil) आणि खोबरेल तेल देखील सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी खोबरेल तेलाचे 2-3 थेंब घ्या. त्यात एरंडेल तेलाचे 2-3 थेंब मिसळा आणि चेहऱ्याला लावा. काही दिवसात फरक दिसून येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com