पर्ण पेठे बनली रॅपर ? पर्णने मराठी, हिंदी, पारसी, गुजराती भाषेत केलं रॅप

पर्ण पेठे बनली रॅपर ? पर्णने मराठी, हिंदी, पारसी, गुजराती भाषेत केलं रॅप

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभिनेत्री पर्ण पेठे सध्या तिच्या एका हटके कामामुळे चर्चेत आली आहे. पर्ण पेठेच्या मराठी रॅपविषयी बोललं जातयं.  मराठी अभिनेत्रींना असं रॅप करताना आपण क्वचितच पाहिलय. मात्र पर्ण पेठेच्या रॅपने जबरदस्त राडा केला आहे. आता तुम्हाला वाटेल पर्णने हे रॅप एखाद्या चित्रपटासाठी वैगेरे गायलं असावं, पण तसं नाही. तर पर्णने नुकतच पृथ्वी महोत्सवात एक नाटक सादर केलय. 'Bone of contention in Cosmopolitan CHS' या नाटकात पर्णची एक हटके भूमिका आहे. पर्ण या नाटकात महाराष्ट्रीयन मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहे. या नाटकात पर्ण निवेदक आहे.

अशी निवेदक जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाट्यरसिकांचं लक्ष वेधून घेते.
या नाटकात पर्णने तब्बल 14 रॅप गायले आहेत. यात पारसी, हिंदी, मराठी, गुजराती अशा भाषांमधील रॅपचा समावेश आहे. या नाटकात विविध ठिकाणच्या कलाकारांची धमाल भट्टी जमली आहे. मुंबई, लखनऊ, दिल्ली, पुणे, उत्तराखंड, देहरादून आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेले जबरदस्त उर्जा असलेले कलाकार या नाटकात आहे.

पृथ्वी थिएटरशी असलेलं खास नातं साम टीव्हीशी बोलताना पर्णने शेयर केलं. पर्णने तिच्या पहिल्या नाटकाचा प्रयोगही पृथ्वी थिएटरच्या मंचावरचं सादर केला होता. पृथ्वीच्या रंगमंचावर पर्णने बऱ्याचदा नाटकं सादक केली आहेत.
एक कॉस्मोपॉलिटन सोसायटीत राहणाऱ्या चार विविध भाषिक परिवाराची एका 'हड्डी'मुळे उडणारी तारांबळ, त्यात मोलकरणीची त्यांना होणारी मदत हे सगळं रंजक पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. पृथ्वी महोत्सवानंतर पृथ्वी थिएटरलाच या नाटकाचे प्रयोग होतील, शिवाय दिल्ली, लखनऊ आणि पुन्हा मुंबईत हे नाटक नाट्यरसिकांचं मनोरंजन करेल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com