Children's Day 2024: बालदिनानिमित्त मुलांना फिरायला घेऊन जा, दिल्लीतील 'या' ठिकाणांना भेट द्या

Children's Day 2024: बालदिनानिमित्त तुम्हाला तुमच्या मुलाला कुठेतरी घेऊन जायचे असेल तर दिल्लीत काही खास ठिकाणे आहेत, जिथे मुले मनसोक्त मजा करू शकतात.
delhi best place
delhi best placeyandex
Published On

दरवर्षी प्रमाणे, 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस मुलांना समर्पित केलेला दिवस आहे. आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आणि राष्ट्राचे भविष्य असलेल्या मुलांचे महत्त्व आणि उपयुक्तता समजून घेऊन त्यांना आनंदी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. मुलांच्या मनोरंजनासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये रंगारंग कार्यक्रम आयोजित केले जातात. पुरस्कारांचे वितरण केले जाते. याशिवाय काही शाळा मुलांना सहलीला घेऊन जातात.

अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी मुलं आराम करतात आणि दिवस मजेत घालवतात. बालदिनानिमित्त तुम्हाला तुमच्या मुलाला कुठेतरी घेऊन जायचे असेल तर दिल्लीत काही खास ठिकाणे आहेत, जिथे मुले मनसोक्त मजा करू शकतात. येथे पोहोचल्यानंतर मुलांचे चेहरे फुलतील.

Qutb Minar
Qutb Minaryandex

कुतुबमिनार (Qutb Minar)

प्रसिद्ध कुतुबमिनार राजधानी दिल्लीत आहे. या सँडस्टोन टॉवरचे बांधकाम 1192 मध्ये सुरू झाले. हा विटांनी बनलेला जगातील सर्वात उंच टॉवर असल्याचे सांगितले जाते. इतर ऐतिहासिक स्थळांनी वेढलेले, हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्मारकांपैकी एक आहे. कुतुबमिनार दक्षिण दिल्ली शहराच्या मेहरौली भागात आहे. येथे मुले खूप मजा करू शकतात.

Akshardham Temple
Akshardham Templeyandex

अक्षरधाम मंदिर (Akshardham Temple)

स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. 141 फूट उंच, 316 फूट रुंद आणि 356 फूट लांब अक्षरधाम मंदिरात हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो. अक्षरधाम मंदिराच्या जवळचे मेट्रो स्टेशन अक्षरधाम आहे.

delhi best place
November Travel Destinations: नोव्हेंबरच्या अखेर अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये 'या' ठिकाणांना भेट द्या
Worlds of Wonder
Worlds of Wonderyandex

वर्ल्ड ऑफ वंडर (Worlds of Wonder)

हे नोएडा येथील एक मनोरंजन उद्यान आहे, जे उत्तर भारतातील सर्वात मोठे मनोरंजन उद्यान आणि वॉटर पार्क आहे. हे ठिकाण मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते. बोटींग, रेन डान्स आणि अनेक प्रकारचे व्हिडीओ गेम्सची सुविधा येथे उपलब्ध आहे.

National Bal Bhavan
National Bal BhavanGoogle

राष्ट्रीय बाल भवन, दिल्ली (National Bal Bhavan)

राष्ट्रीय बाल भवन ही मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ITO, नवी दिल्ली येथे आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1956 मध्ये स्थापन केलेल्या या केंद्राचे उद्दिष्ट लहान मुलांच्या सर्जनशील क्षमतेचे पालनपोषण करणे आणि त्यांना परस्परसंवादी वातावरण उपलब्ध करून देणे हे आहे. बालभवन सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत खुले असते. १६ वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि १६ वर्षांवरील मुलांसाठी २० रुपये.

Written By: Dhanshri Shintre.

delhi best place
Celebrities: फक्त भारतातच नाही तर परदेशातही 'या' स्टार्सनी बनवली घरे, जाणून घ्या त्यांच्या आलिशान घरांची किंमत

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com