Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यावर 'गद्दारी' होत नाही का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 'साम' वृत्तवाहिनीवरील 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यात त्यांनी बेडरूममधील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या टीकेबद्दल आणि महायुतीवर नाराज असलेल्या चर्चेबद्दल भाष्य केले.
Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यावर गद्दारी होत नाही का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Sanjay ShirsatSaam Tv
Published on
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

आम्ही जे 60 आमदार निवडून आलो आहोत, त्यांना विचारा, तुझ्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा आहे? ते स्पष्टपणे सांगतील, एकनाथ शिंदे साहेबांमुळे आम्हाला सर्वात जास्त फायदा झाला - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

बेडरूमची बॅग इतकी फेमस झाली आहे. त्यामुळे आता मी कोणाला बेडरुममध्येच काय, घरामध्येही एन्ट्री देत नाही. कोण कुठे कॅमेरा लावून येतील सांगता येत नाही. परंतु, तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

मला कधी-कधी उद्धव ठाकरेंचं आश्चर्य वाटतं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तुम्ही गेल्यावर गद्दारी होत नाही का? शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा खरी गद्दारी तुमची आहे - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा बाळासाहेबांचा फोटो वापरु नका असं त्यांनी म्हटलं. ही एक स्ट्रॅटेजी असते. बाळासाहेबांना आपल्याकडे ओढून घ्यायचं, आणि शिवसेना बाळासाहेबांची की, आमची असं म्हणायचं. आम्ही सोडलंच नाही, त्यामुळे आजही त्यांची तीच फजिती होते - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

मी नाराज नाहीये. काही परिस्थिती वरिष्ठांच्या कानावर घातली पाहिजे. एखादेवेळी माणूस भावनिक होऊन बोलतो. त्याचा अर्थ महायुतीच्या विरोधात आहे, असा लावण्याचं काहीच कारण नाही - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

आमच्यात बांगरांचा स्वभाव वेगळा आहे, भरत गोगावलेंचा स्वभाव वेगळा आहे आणि माझाही स्वभाव वेगळा आहे. भरत साधाही बोलला, तरी त्याची बातमी होते. मी रागावून बोललो आणि शांत बोललो, तरीही त्याची बातमी होते - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

शिवसेनाप्रमुखांशिवाय आपली शिवसेना नाहीच, हे आमचं पहिल्या दिवसापासून ठरलेलं होतं. काहीही झालं, तरी शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या घोषणा, भगवा झेंडा, धनुष्यबाण, हे पहिल्यादिवसापासून ठरलं होतं. म्हणून आम्हाला वेगळं धरायचं असं कधी वाटलं नाही आणि आजही वाटत नाही - संजय शिरसाट

Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam Tv

जी मनसे 20 वर्षांपासून एकाकी लढत आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपुरतं तरी आक्रमकतेने वर्चस्व कायम ठेवलं आहे. हे मान्य करावं लागेल. आता त्यांना न्याय द्यायची वेळ आली आहे, तो मिळेल का? मिळाला तर आनंद आहे, नाही मिळाला तर काय होईल? दोन बाजू आहेत, एक शांततेची, एक आक्रमक. याचा मिलाप कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे - संजय शिरसाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com