आता भारतात राहण्यासाठी लोकांकडे काही कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात दररोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी कागदपत्रांची आवश्यकता पडते. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी कागदपत्रे लागतात.
यामध्ये पॅन कार्ड, मतदार कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि पासपोर्ट सारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. काही कागदपत्रे अशी असतात की, तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही इतर कागदपत्रे वापरू शकता. पण ते विशेषतः विशिष्ट कामांसाठी वापरले जातात.
जसं की, कोणाला परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्ट शिवाय कोणीही परदेशात प्रवास करू शकत नाही. भारतात पासपोर्ट मिळवण्यासाठी, एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
भारतात, पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जातो. यासाठी २६ पासपोर्ट कार्यालये आहेत. तेथे जाऊन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
सरकारने पासपोर्ट संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. आता पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे. हे नियम सर्व लोकांना लागू होणार नाही.
खरं तर, केंद्र सरकारच्या वतीने पासपोर्ट कायद्यात बदल करून, १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय ते पासपोर्टसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
ज्यांचा जन्म १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी झाला आहे. जन्म प्रमाणपत्राच्या जागी जन्मतारीख दर्शविणारा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शाळा सोडल्याचा दाखला यासारखी पर्यायी कागदपत्रे सादर करून तो पासपोर्ट मिळवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.