Weekly Horoscope: 'या' आठवड्यात कुटुंबात अनपेक्षित घटना घडतील; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: प्रत्येक आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आपल्या कौटुंबिक जीवनावर आणि एकूणच आयुष्यावर परिणाम करतात. काहीवेळा हे बदल इतके छोटे असतात की त्यांचा लगेच अनुभव येत नाही, पण काहीवेळा अनपेक्षित घटना घडतात.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक राहील. आनंददायक घटना घडतील. अचानक मोठे लाभ होतील. तृतीयेतील अमावस्या पराक्रम, कर्तृत्व सिद्ध करणारी असून मोठे धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ

सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होईल. दूरचे प्रवास, सहली, मनोरंजन यामधून आनंद घ्याल. स्वभाव 'मूडी' होईल. धन स्थानातील अमावस्या आर्थिक प्राप्ती वाढविणारी राहील. मोठी गुंतवणूक कराल.

मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. कुटुंबात अनपेक्षित घटना घडतील. राशीतील अमावस्या धार्मिक कल वाढवणारी राहील.

कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी-व्यवसायात मनासारखे बदल होतील. वरिष्ठांशी सुसंवाद राहील. सामाजिक/राजकीय क्षेत्रात उत्तम प्रतिसाद राहील.

Weekly Horoscope
Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

सिंह

सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. प्रसिद्धी नावलौकिक वाढेल. तीर्थयात्रा कराल. लाभस्थानात होणारी अमावस्या मोठी इच्छा पूर्ण करणारी असून महत्त्वाच्या कामात यश मिळेल..

कन्या

सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र कमी श्रमात मोठे लाभ होतील. अनपेक्षित बातमी कळेल.

तूळ

सप्ताहाच्या सुरुवातीला तरुणांचे विवाह जमतील. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल. कोर्ट कचेरी/वादविवाद सामंजस्याने मिटतील.

वृश्चिक

सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैसे किमती वस्तूंची काळजी घ्यावी. अष्टमातील अमावस्या आरोग्यासाठी प्रतिकूल असून प्रवासात काळजी घ्यावी.

धनू

सप्ताहाच्या सुरुवातीला संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना जोडीदार मिळेल. प्रेमप्रकरण यशस्वी होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होतील.

मकर

सप्ताहाच्या सुरुवातीला घर/जागेची कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण आनंदी राहील. संततीविषयक कामात यश मिळेल. मात्र षष्टातील अमावस्या आरोग्यासाठी प्रतिकूल राहील.

Weekly Horoscope
Kendra Yog: 23 जूनपासून 'या' राशींची होणार चांदीच चांदी; सूर्य-शनी बनवणार केंद्र योग

कुंभ

सप्ताहाच्या सुरुवातीला आनंदाची बातमी कळेल. छोटे प्रवास, सहली, मनोरंजनातून आनंद मिळेल. भावंडांविषयी चांगल्या घटना होतील. नोकरीत बदलीचे प्रसंग येतील. पंचमातील अमावस्या संततीसौख्यासाठी अनुकूल राहील.

मीन

सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबात आनंददायक घटना घडेल. पैशाची कामे होतील. भावंडे नातेवाइकांचा सहवास लाभेल. चतुर्थातील अमावस्या घर/वाहन/प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम राहील.

Weekly Horoscope
Mahalakshmi Yog: 9 दिवसांनी 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; चंद्र-मंगळाच्या युतीने बनणार महालक्ष्मी योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com